अ-हेरनवरगाव येथे भुलाई मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना.

अ-हेरनवरगाव येथे भुलाई मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक.


ब्रम्हपुरी - दिनांक,१९/१०/२०२४ गणपती, मस्क-या गणपती, शारदा, दुर्गा मातेचे उत्सव साजरे करून विसर्जन झाले की लगेच भुलाई मातेच्या मूर्तीची काही हौशी मंडळ प्रतिष्ठापना करून खेळी- मेळीच्या वातावरणात वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवून जनजागृती वआनंदोत्सव साजरा करुन स्नेह भोजनाने त्याचा शेवट करीत असतात.

अ-हेरनवरगांव येथील हौशी नवतरुण महिला  भुलाई मंडळाच्या वतीने भुलाई मातेची प्रतिष्ठापना दिनांक १६ ऑक्टोंबर रोजी श्री सखारामजी ठेंगरे, मोतीलालजी नंदनवार,सौ किरण ताई तलमले,यांनी विधीवत पूजा करून करण्यात आली.



यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व मार्गदर्शक श्री वामनरावजी मिसार,श्री देवलालजी ठेंगरे,श्री सुभाष ठेंगरे माजी सैनिक, रमेश करंडे, सुरेश बनकर पिंपळगाव,अमरदीप लोखंडे, सौ.कालींदा ठेंगरे,सौ छायाताई धकाते ,सौ.अस्मिता ठेंगरे  , सौ.संगीताबाई ठेंगरे, सौ.मीनाताई धोटे, सौ.मीनाक्षी वैद्य या हौशी तरुण महिला भुलाई मंडळाच्या पदाधिकारी व सदस्या उपस्थित होत्या.

भुलाई मातेच्या मूर्ती ची जळण- घळण करणारा मूर्तिकार कैलास वकेकार यांच्या मार्गदर्शनात शरद तलमले, सूरज टेंभूरकर,राजेंद्र ठेंगरे यांनी भुलाई मातेचा जयघोष करून भजन मंडळी रवी वकेकार यांनी आपल्या साथीदारांच्या साथीने भुलाई मातेला दिंडी, भजनाने वाजत गाजत नेऊन कार्यक्रम स्थळी मांडण्यासाठी खूप मोठे मोलाचे सहकार्य केले. यावेळी गावातील लहान मुलांपासून तर वयोवृद्धापर्यंत भक्तगण उपस्थित होते.


हौशी नवतरुण महिला भुलाई मंडळ यांनी सात-आठ दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचे शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी पडणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धात्मक कार्यक्रमाचे तसेच जनतेचे मनोरंजन करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.सदर राबविण्यात येणाऱ्या उपक्रम, कार्यक्रमाचे एक चांगला उपक्रम म्हणून जनमानसात चर्चा केल्या जात आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !