कळमना येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी.
★ उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या पुढाकाराने स्वच्छ सुंदर व निर्मळ परिसर स्पर्धेचे आयोजन.
राजेंद्र वाढई : उपसंपादक
राजुरा : कळमना येथे परमपूज्य महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून या दोन्ही महापुरुषांना विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच या दिनाचे औचित्य साधून उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या पुढाकाराने स्वच्छ सुंदर व निर्मळ परिसर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव, जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र सरपंच संघटना चंद्रपूर , उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई म्हणाले की, परमपूज्य महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला आणि शास्त्रीजींनी जय जवान जय किसान असा नारा दिला.
ग्रामीण जीवन, येथील सौजन्य, जिव्हाळा, शेतकरी जीवन, कष्टकरी संस्कृती याचे महत्त्व या महापुरुषांनी ओळखले होते आणि राष्ट्र उभारणीत ग्रामीण संस्कृती व जनजीवन किती महत्त्वाचे आहे हे त्यांना समजले म्हणून यांच्या जयंतीनिमित्त कळमना येथे स्वच्छ सुंदर व निर्मळ परिसर स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेत गावातील अनेक कुटुंबाने आपल्या घरासमोरील परिसर स्वच्छ करून रांगोळी काढून परिसर स्वच्छ व सुंदर निर्मळ केला.
या प्रसंगी पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, ग्रामसेवक मरापे, ग्रा. प. सदस्य साईनाथ पिंपळशेंडे, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष महादेव ताजणे, सचिव दत्ताजी पिंपळशेंडे, कार्यकर्ते सुरेश गौरकार, श्रावण गेडाम, अंगणवाडी सेविका लता क्षिरसागर, भारत मधुकर टेकाम, ज्येष्ठ नागरिक उद्धव आस्वले, कवडू पिंगे, अमोल कावळे, विठ्ठल विदे, कवडु मुठलकर, अशोक कावळे, शकुंतला पिंगे, सुमनबाई आसवले, सुषमा पिंगे, इंदिरा मेश्राम, सुनील मेश्राम, विशाल नागोसे यासह विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते.