आरमोरी तालुक्यातील इंजेवारी येथील युवकास आरमोरी पोलिसांनी केली अटक. ★ अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेऊन तिला केला गर्भवती.

 


आरमोरी तालुक्यातील इंजेवारी येथील युवकास आरमोरी पोलिसांनी केली अटक.


अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेऊन तिला केला गर्भवती.



एस.के.24 तास


आरमोरी : एका अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेऊन तिला गर्भवती करणाऱ्या आरोपी युवकास आरमोरी पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केल्याची घटना दिनांक,24 ऑक्टोबर रोजी घडली. 


विनोद घनश्याम पात्रीकर वय,20 वर्ष रा.इंजेवारी ता. आरमोरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या प्राप्त माहितीनुसार यातील फिर्यादी पिडीतेची आई ही दि २२ ऑक्टोबर २०२४ रोजी काम करुन घरी आल्यावर त्यांना त्यांची मुलगी पिडीता ही घरी आढळून आली नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेवुनही ती मिळुन नआल्याने आरमोरी पोलीस ठाण्यात रिपोर्ट देण्यासाठी आली असता आरमोरी पोलीसांनी तिच्या लोकेशन बाबत माहीती काढुन तिचा त्वरीत शोध घेतला. मुलगी मिळुन आल्याने कोणतीही तक्रार करायची नाही असे लेखी दिले व रिपोर्ट न देता मुलीला ताब्यात घेवुन घरी गेली.


त्यानंतर दि.२३ ऑक्टोबर रोजी पिडीतेच्या आईला व नातेवाईकांना पिडीता गर्भवती असल्याबाबत शंका आल्यानेपिडीतेच्या आईने केलेल्या तपासणीत पिडीता ही गर्भवती असल्याचे लक्षात आले.पिडीतेला विश्वासात घेवून तिच्या आईने विचारले असता पिडीतेने इंजेवारी येथील विनोद पात्रीकर याने आपल्यासोबत शारिरीक सबंध प्रस्थापित केल्याचे सांगितले.



यामुळे पिडीतेच्या आईने आरमोरी पोलीस ठाण्यात येवुन दिलेल्या तोंडी रिपोर्ट वरून आरमोरी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात कलम ३७६ (२) (१), ३७६ (२) (नं, भा. द. वी. सहकलम ४,६,८,१२, बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम२०१२ अन्वये गुन्हा नोंद केली व दिनांक २४ ऑक्टोबर रोजी आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीवर गुन्हा दाखल होताच आरोपीस न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास आरमोरी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती राक्षे करीत आहेत.



पीडितेला पुढील वैद्यकीय उपचारासाठी गडचिरोली येथील महीला व बालरुग्णालय येथे पाठविण्यात आले.

 


आरमोरी तालुक्यात पोक्सो अंतर्गत गुन्ह्यांची वाढली संख्या आरमोरी हे विद्येचे माहेरघर असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी, विद्यार्थीनी आरमोरी येथे शिक्षणासाठी येतात. मात्र समाजमाध्यमांच्या आहारी जाऊन नको ते कृत्य करीत असल्याने आरमोरी पोलीस ठाण्याअंतर्गत पोक्सो खालील गुन्ह्यामध्ये वाढ होत असल्याचे दिसुन येत आहे. याकरीता शाळा, कॉलेजमध्ये प्रबोधन करण्याची गरज व्यक्त होत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !