पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक उभारण्यात यावे. - धनगर समाज मुल ची मागणी.
सुरेश कन्नमवार ! मुख्य संपादक
मुल : मुल शहरातील वॉर्ड क्र.1 येथे धनगर समाज हा अनेक वर्षापासून वास्तव्य करीत आहे.धनगर समाजाच्या वतीने वार्ड क्रमांक 1 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती व विविध उपक्रम राबविले जातात.वार्डामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी नियोजित जागा ठरवलेली आहे.त्यात चौकाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक असे नाव देण्यात आलेले आहे.
नगरपरिषद मूल च्या माध्यमातून नियोजित जागेवर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारून द्यावे अशी मागणी मुख्याधिकारी यांना निवेदनातून केली आहे.
यावेळी धनगर समाजाचे अध्यक्ष,नितेश मॅकलवार,धनगर समाजाचे जेष्ठ नागरिक बंडूजी मर्लावार,दीपक लंबुवार,आकाश यारेवार,आकाश आरेवार,हर्षद धुळेवार,संजय कंकलवार,आशिष यारेवार,मल्हा चिटेवार,प्रकाश मुद्रिवार,आशिष देवेवार,राजू मेडिवार,सोहन यारेवार व आदी धनगर समाज बांधव उपस्थित होते.