माळी समाज संघटना सावली तालुक्यातर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन.

माळी समाज संघटना सावली तालुक्यातर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन.


सुदर्शन गोवर्धन : प्रतिनिधी सावली 


सावली : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी समाजाच्या पतनाचे कारण शोधले आणि समाज क्रांतीचे पहिले शस्त्र म्हणून शिक्षणाचे कार्य हाती घेतले.शिक्षणाचे बीज हे विद्यार्थी जीवनातच रोवल्या जावेत आणि विद्यार्थ्यांच्या गुणांचे कौतुक व्हावे.यासाठी सावली तालुका माळी समाज संघटना यांचे तर्फे नुकताच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन सावली येथील पत्रकार भवन मध्ये घेण्यात आलेले होते.



गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे उद्घाटन डॉ.अभिलाषाताई गावतुरे यांनी केले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.मिलिंद सुपले हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. हेमराज निखाडे,श्री बळीराज निकोडे हे होते. 


सावली तालुका माळी समाज संघटना तर्फे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात इयत्ता १० वी  मधील गुणवंत प्राप्त 13 विद्यार्थ्यांचा तर १२ वी  मधील गुणवंत प्राप्त 14 विद्यार्थ्यांचा  ,  नवोदय शाळेमध्ये प्रवेशप्राप्त १ विद्यार्थी ,  गोंडवाना विद्यापीठ येथे मेरिट प्राप्त १ विद्यार्थ्यांचा 


आयटीआय मधील मेरिट १ विद्यार्थ्यांचा , उत्कृष्ट क्रीडा प्राविण्य प्राप्त १ विद्यार्थी ,  वनरक्षक या शासकीय पदावर निवड झालेल्या एक विद्यार्थिनीचा तसेच सावली येथील विपुल वाढई  हा विद्यार्थी दुबई येथे टेक्निशियन म्हणून कार्यरत असल्याने त्या विद्यार्थ्यांचा शिल्ड व प्रमाणपत्र देऊन  सत्कार करण्यात आला . 


सदर कार्यक्रमाचे संचालन रोशन गुरनुले कार्यक्रमाचे प्रास्तविक,शिलाताई गुरनुले तर आभार प्रदर्शन सुनिल ढोले यांनी केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावली तालुका माळी समाज संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते , समाज बांधव यांनी अथक परिश्रम घेतले .

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !