सुदर्शन गोवर्धन : ग्रा.ता.प्रतिनीधी,सावली
सावली : तालुक्यातील ग्राम डोनाळा येथील शेतकरी पांडुरंग गेडाम व तुळशीराम गेडाम यांच्या शेतात हत्तींचे करप दिनांक.05/10/2024 ) रोजी फिरल्याने गर्भात आलेले धान पिकाची नासाडी झाली आहे.
शेतकऱ्याने सांगितले की रात्रीला 9 ते 10 वाजता दरम्यान जंगल भागातून हतींचे करप आपल्या शेतात शिरले परिणामी तोंडात आलेले धान पीक हत्तीच्या कळपाने पायाखाली तुडवल्या गेल्याने नष्ट झाले.धान पेरणी पासून ते आज पर्यंत आलेला खर्च कुठून भरायचा अशी चिंता शेतकऱ्यावर आली आहे.
सोनापुर/ सामदा वनपरिक्षेत्रात सुध्दा हत्तींचे कळप फिरत आहेत.त्यामुळे वन विभागाने शेतकर्यांना अलर्ट केलं आहे.
मात्र झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई द्यावी अशी मागणी डोनाळा, कढोली,हरांबा,उपरी,भांशी,नि.पेडगाव, कापसी, सोणापुर, सामदा,व्याहाड बूज, वाघोली बुट्टी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ करीत आहेत.