पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा राजा माने यांना समर्पित जीवन पुरस्कार.

पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा राजा माने यांना समर्पित जीवन पुरस्कार.


एस.के.24 तास


मुंबई : पुण्याच्या एमआयटी विश्र्वशांती विद्यापीठाच्या वतीने संपादक,माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक तसेच डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल " समर्पित जीवन गौरव पुरस्कार " जाहीर झाला आहे. 


लोणी काळभोर येथे होत असलेल्या जागतिक विश्र्वशांती परिषदेत दि‌. ४ ऑक्टोबर रोजी या पुरस्काराचे वितरण होणार असल्याचे संयोजक एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विश्वनाथ कराड व भारताच्या महासंगणकाचे जनक शास्रज्ञ डॉ.विजय भटकर यांनी कळविले आहे.


जगातील शास्त्रज्ञ,तत्त्वज्ञ आणि विश्र्वशांती चळवळीतील विचारवंत सहभागी होत असलेल्या दहाव्या जागतिक विश्र्वशांती परिषदेचे आयोजन दि.३,४ व ५ ऑक्टोबर रोजी लोणी काळभोर येथील विश्वराज बाग येथे करण्यात आले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !