काँग्रेस उमेदवार संतोषसिंह रावत यांनी शक्तिप्रदर्शन करन दाखल केले उमेदवारी अर्ज ; अफाट गर्दी.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : मुल - ७२ बल्लारपूर विधानसभे करीता उमेदवारी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांनी शक्ती प्रदर्शन करत भव्य दिव्य रॅली काढून नामांकन अर्ज दाखल केला.जनतेमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीची विशाल रॅली बघून जनतेने काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांच्या विजयावर आताच शिक्कामोर्तब केल्या अश्या जनतेत चर्चेला उधाण आले होते.
भाजपाच्या रॅली पेक्षा मोठ्या प्रमाणावर आणि स्थानिक मतदार संघातील मतदार महाविकास आघाडीच्या आजच्या रॅलीत जनता उस्फुर्तपणे दिसून आल्याच्या चर्चा होत्या.तीन दशकाच्या मक्तेदारीतुन परिवर्तन घडवून आणण्यासाठी जनता एकत्र आल्याचे बोलले जात होते.
खुल्या जीपवर संतोष सिंह रावत,काँग्रेस नेते संदीप गड्डमवार,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभा प्रमुख सुमित समर्थ, प्रकाश कागदेलवार,बाबा अझीम,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी इत्यादींची उपस्थिती होती.
असंख्य महिला,युवक,नागरिकांची रॅलीने काँग्रेसमय वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत होते.रॅलीचे विशेष आकर्षण आदिवासी नृत्य, बैल बंडी,शेतकरी, ढोलताशा महाविकास आघाडीचे झेंडे,संतोषसीह रावत यांचे पोस्टर्स ,बॅनर पाहून संतोषसिंह रावत यांचा विजय तर झालाच आहे मात्र किती मताधिक्यानि संतोषसिंह रावत विजयी होणार यावर आता चर्चा सुरू झाल्याचे दिसून आले.
निवडणूक निर्णय अधिकारी श्री. चरडे, सहाय्यक अधिकारी तहसीलदार मृदुला मोरे,पवार साहेब यांचेकडे संतोषसिंह रावत यांनी नामांकन अर्ज दाखल केला.
यावेळी तेलंगणाचे खासदार रेड्डी, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार,ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष जेसाभाई मोटवानी,काँग्रेस नेते घनश्याम मुलचंदानी,तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, गुरुदास चौधरी, राजेंद्र कन्नमवार उपस्थित होते.
माजी नगराध्यक्ष विजय चिमड्यालवार यांनी आज कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला.महाविकास आघाडीचे उमेदवार,कॉंग्रेसचे जेष्ठ नेते संतोष रावत यांचे उमेदवारीचे समर्थनार्थ श्री.विजय चिमड्यालवार यांनी पक्षात प्रवेश घेतल्यांने संतोष रावत यांनी त्यांचे स्वागत केले. विजय काँग्रेसमध्ये आल्याने संतोष रावत यांना विजयात मताधिक्य वाढविण्यात सुनिश्चित फायदा होणार असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
मागील काही वर्षापूर्वी कॉंग्रेसचेच चिमड्यालवार यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी श्री. रावत यांनी त्यांचे कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.या पत्रकार परिषदेपूर्वी श्री.विजय चिमड्यालवार यांनी पक्ष प्रवेश केला.
मुल-बल्लारपूर निर्वाचन क्षेत्राच्या विकासाकरीता आपली उमेदवारी असून, मागील अनेक वर्षापासून आरोग्य, बेरोजगार, वाघाचे हल्ले, भाववाढ, GST, घरकुल,शिक्षण समस्या, उद्योग नाही, शेतीला सिंचन नाही, शेती पंपाचे कनेक्शन नाही, पीक विम्याचे पैसे नाही, महिलांवरील अत्याचार, घरगुती वीजदर वाढ असे अनेक प्रश्न सुटले नाही, ते प्रश्न सोडविण्यांचा आपण प्रयत्न करणार असल्यांचे त्यांनी पत्रकारांचे प्रश्नाचे उत्तरात सांगीतले.
स्थानिक एमआयडीसीत उद्योग आहेत, मात्र मजूर परप्रांतीय आहेत, या उद्योगात स्थानिक कामगारांना काम मिळेल याकरीता आपण प्रयत्न करणार असल्यांचे सांगीतले. यावेळी लाडक्या बहीणसह अनेक प्रश्नावर त्यांनी उत्तरे दिलीत.
पत्रकार परिषदेला कॉंग्रेसचे नेते संदीप गड्डमवार, विजय चिमड्यालवार, गुरूदास गुरूनुले प्रकाश कागदेलवार,राकेश रत्नावार रुपल रावत, यांचेसह कॉंग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.रॅली आयोजनासाठी अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.