कोरची तालुक्यात वंचित चा मेळावा संपन्न.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
कोरची : आज दिनांक 09ऑक्टोंबर 2024 ला आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कोरची तालुक्यातील बेळगाव या ठिकाणी वंचीत बहुजन आघाडी कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात आला. यात तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झालेत.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक प्रशांत देव्हारे हे कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच पूर्व विदर्भ कार्यकारिणी सदस्य श्री बाळूभाऊ टेंभुर्णे, मंगलदास चापले जिल्हा महासचिव, राजरतन मेश्राम जिल्हा कार्यकारीनी सदस्य, प्रेम जगझागे तसेच कोरची तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्याचबरोबर समता सैनिक दलातील सैनिक उपस्थित होते.