राष्ट्रीय शहिद दिन साजरा.


राष्ट्रीय शहिद दिन साजरा.


मुनिश्वर बोरकर गडचिरोली


गडचिरोली : राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद,बामसेफ व आफसुट विंगच्या वतीने राष्ट्रीय शहिद विर बाबुराव शेडमाके यांचा राष्ट्रीय शहिद दिन साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाचे अध्यक्ष भोजराज कान्हेकर बामसेफचे जिल्हाध्यक्ष  हे होते. 



प्रमुख मार्गदर्शक ज्योती आत्राम जिल्हा प्रभारी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद , प्रमोद बांबोळे जिल्हाध्यक्ष प्रोटान , प्रमोद राऊत एम . एन टिव्ही चॅनल हे होते .

       

कार्यक्रमाचे अध्यक्ष भोजराज कान्हेकर बामसेफ जिल्हाध्यक्ष म्हणाले की, विर बाबुराव शेडमाके हे मुलनिवासींची जल , जंगल ,जमीन वाचविण्यासाठी फासावर गेले पण इंग्रजांची शरणांगती स्विकारली नाही . याचा आदर्श मुलनिवासी बांधवांनी घेऊन आपला गुलामितून मुक्त होण्यासाठी संघर्ष करावे . ज्योती आत्राम जिल्हा प्रभारी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद म्हणाल्या की , आदिवासी समाज  हा अज्ञानी व साधाभोळा आहे . त्यामुळे या समाजाची फसवणूक केली जाते . नरेश बांबोळे जिल्हाध्यक्ष प्रोटान म्हणाले की,


 विर बाबुराव शेडमाके यांचा आदर्श समाजाने घेऊन आपली विरासत वाचविण्यासाठी लढले पाहिजे तरच समाजाची प्रगती होईल . . प्रमोद राऊत एम . एन . टिव्ही चॅनल म्हणाले की , आदिवासी समाजाचे विस्थापन मोठ्या प्रमाणात विकासाच्या नावावर केले जात आहे . त्याचे विस्थापन थांबविणे आवश्यक आहे   संचालन यज्ञराज जनबंधू यांनी केले तर आभार आनंद अलोणे यांनी मानले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !