ने.हि.महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,०३/१०/२४ येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात जगाला शांतीचा,अहिंसेचा संदेश देणारे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती कार्यक्रम महाविद्यालयात पार पडला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एच गहाणे, उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकर,मेजर प्रा विनोद नरड,अधीक्षक संगीता ठाकरे यांनी प्रतिमांना माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी ' जय जवान जय किसान ', ' भारत माता की जय ', ' महात्मा गांधी की जय ', ' वंदे मातरम् ' चा नारा देत घोषणा दिल्या.
उपस्थित डॉ रेखा मेश्राम, डॉ तात्याजी गेडाम, डॉ असलम शेख, डॉ धनराज खानोरकर, डॉ मोहन कापगते, डॉ किशोर नाकतोडे, डॉ रतन मेश्राम, डॉ भास्कर लेनगुरे, डॉ युवराज मेश्राम,डॉ योगेश ठावरी, डॉ वर्षा चंदनशिवे, डॉ प्रकाश वट्टी,डॉ पद्माकर वानखडे डॉ अरविंद मुंगोले,प्रा दलेश परशुरामकर
प्रा.जयेश हजारे, पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर,प्रा डॉ दुपारे,प्रा अभिजित परकरवार,रोशन मेश्राम,डॉ मोहूर्ले,अलोक मेश्राम,प्रज्ञा मेश्राम,राजू मेश्राम,शशिकांत माडे इत्यादींनी प्रतिमांना पुष्पगुच्छ वाहून अभिवादन केले.यानंतर महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात आला.
संचालन व आभार समिती प्रभारी डॉ.कुलजित शर्मानी केले.यशस्वीतेसाठी डॉ खानोरकर,डॉ मेश्राम,प्रा धिरज आतला,जगदिश गुरनुले,प्रदीप रामटेकेंनी मोलाचे सहकार्य केले.