बल्लारपूर विधानसभा क्षेत्र " उबाठा " च्या उठाबशा अन कांग्रेसची कसरत..! राजरंग : - प्रा.महेश पानसे.

बल्लारपूर विधानसभा क्षेत्र " उबाठा " च्या उठाबशा अन कांग्रेसची कसरत..!


राजरंग : - प्रा.महेश पानसे.


एस.के.24 तास


बल्लारपूर : बल्लारपूर विधानसभा मतदार संघ शिवसेना (उबाठा) ची उठबस व कांग्रेसी इच्छुकांची  सुरू असलेली भारी कसरत यामुळे अधिक चर्चेत आला आहे.इकडे आघाडीतील या दोन्ही पक्षांच्या इच्छुकांनी उमेदवारी आपल्या खिषातच ' असल्याची बतावणी करून आपापल्या कार्यकर्त्यांना दटे रहो चे संकेत दिले असले तरी विधानसभा क्षेत्रातील मतदार मात्र आधी उमेदवारी आणून दाखवा म्हणत  इच्छुकांची शुगर वाढवीत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.


शिवसेना (उबाठा) चे संदिप गिऱ्हे यांचा अडंगा एवढा भारी पडेल याची कल्पना कदाचित कांग्रेस जणांनी केली नसेल.काही महिन्यांपासून सिधापाणी घेऊन क्षेत्रात तळ ठोकणारे संदीप गिऱ्हे चक्क या विधानसभा क्षेत्रावरच पक्षाला दावा ठोकण्यापावेतो नेतील असे कांग्रेस जणांना नक्कीच वाटले नसेल असे उबाठा ची उठबस बघून लक्षात येते.         

           

" उबाठा " ची उठबस सुरू झाली तर इकडे उमेदवारी आणण्यासाठी कांग्रेस ची मोठी कसरत वरून खालपर्यंत होताना दिसत आहे.बल्लारपूर विधानसभा आधी खेचून आणण्याचे आव्हान एवढे सहज असेल असे परिस्थिती बघता जाणकारांना वाटत नाही.


आघाडीतील वरिष्ठ नेते यावर काय तो निर्णय घेतील पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात होऊन ही गुंता सुटला नसल्याने उबाठा ची उठबस व कांग्रेसजणांची भारी कसरत सुरुच असल्याचा अंदाज क्षेत्रातील मतदारांना आला आहे हे निश्चित.


शिवसेना ( उबाठा) ची उठबस कुठल्या आधारावर सुरु आहे हे त्या पक्षालाच माहिती पण यामुळे प्रचंड कसरत करून आघाडीतील सारे इच्छुक सध्यातरी " सलाईन " वरच हे मात्र खरे.


गत विस वर्षात या विधानसभा क्षेत्रात विधानसभा निवडणुकीत कांग्रेस दोन नंबर वर राहीली आहे.मतांची टक्केवारी बघता भा.ज.पा.उमेदवारास सरळ टक्कर देण्याची क्षमता कांग्रेस मध्ये आहे हे सत्य असले तरी यावेळी (शिवसेना उबाठा) चे गिऱ्हे नावाचे ग्रहण ऐवढे खग्रास होईल व शेवटपावेतो या क्षेत्रावर सहज दावा करता येणार नाही.


ही कल्पना कुणालाच आली नसावी हे परिस्थिती बघून लक्षात येण्याजोगे दिसते.सरते शेवटी बल्लारपूर विधानसभा कांग्रेस ला गेली तरी ए- बी फार्म कुणाच्या हातात पडेल हे सांगणे फार 


अवघड काम असल्याचा इतिहास आहेच.शिवसेना उबाठा च्या उमेदवारीसाठी उठाबशा या क्षेत्रात कांग्रेस ला ' डेंजर झोन ' मध्ये आणणाऱ्या असल्या तरी भा.ज.पा.दिग्गज उमेदवारास गारद करण्यासाठी शिवसेना उबाठा उमेदवारास आघाडीतील इतर घटक पक्ष रसद पुरविणार का ? हा सवाल आहेच.असे झाले नाही तर या क्षेत्रात आघाडीची पिछाडी भली मोठी असेल असे जाणकार बोलताना दिसतात.


कांग्रेस हायकमानची या मतदारसंघासाठी एकच मोहीम असेल आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे आधी जागा मग उमेदवाराची घोषणा.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !