एस.के.24 तास
चंद्रपूर : राष्ट्रीय समाज पक्ष हा २०१४ पासुन महायुतीचा घटक पक्ष आहे.२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाला महायुतीतून १ जागाला मिळाली त्यात पक्षाला पराभव पत्करावा लागला. महायुतीने २०१९ च्या निवडणूकीत राष्ट्रीय समाजाला दौंडची जागा दिली असतांनाच भाजपाने खेळी करून राष्ट्रीय समाज पक्षाचे असलेल्या उमेदवाराला भाजपाकडून लढविण्यात आणि ते पडले.त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे आतापर्यंत ४ आमदार झाले असून ९८ जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरसेवक निवडून आले आहेत इतकेच नव्हे तर गुजरात मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची नगरपालिकेत सत्ता आहे.राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री मा.आमदार महादेवराव जानकर साहेब हे स्वतः नांदेड,बारामती,माढा, परभणी लोकसभा निवडणुकीत उभे राहिले आहेत.जानकर साहेबांना दुसऱ्या क्रमांकावर रहावे लागले आहे.
राष्ट्रीय समाज पक्ष तळागाळातील उपेक्षित ओबीसी दलीत आदीवासी मराठा समाजाला अपेक्षित ठिकाणी नेण्यासाठी काम करीत आहे.
या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाला महायुतीने सन्मानजनक जागा न दिल्यास स्वबळावर २८८ उमेदवार लढविणार असल्याचे पक्षाच्या पार्लमेट्री बोर्डाने सांगीतले आहे.त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रात उमेदवार उभे करणार आहेत.
त्यात राजुरा, बल्लारपूर ब्रम्हपुरी आणि चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार आहे.या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ महासचिव संजय कन्नावार,ग्रामीण जिल्हाध्यक्ष, आनंदराव अंगलवार,शहर जिल्हाध्यक्ष,रमाकांत यादव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.