वलनी येथील नागरिकांचे संतोषसिंह रावत यांना समर्थन.

वलनी येथील नागरिकांचे संतोषसिंह रावत यांना समर्थन.

                                                

राजेंद्र वाढई : उपसंपादक


मुल : मुल - बल्लारपूर विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाकडून प्रबळ उमेदवारीचे दावेदार असलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत आणि काँग्रेसचे पदाधिकारी पक्ष संघटन बळकट करण्यासाठी   आणि पक्षाची भूमिका गावागावात पोहचविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.त्यासाठी आढावा बैठका घेतल्या जात आहेत. बूथ संघटना मजबूत करण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.



त्या अनुषंगाने मुल तालुक्यातील मौजा  वलनी येथे बैठक आयोजित करण्यात आली.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी पक्षाची ध्येय धोरणे,पक्ष संघटना आणि मुल-बल्लारपूर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून येण्याच्या दृष्टीने एकजुटीने प्रयत्न करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.


वलनी येथील जनतेनी संतोषसिंह रावत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून जनतेच्या हाकेला ओ देणारे नेते आहेत. मदतीच्या काळात वेळी अवेळी धावून येतात.जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून संतोषसिंह रावत यांचे कार्य उल्लेखनीय आहे. 


मूल-बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात तीन दशकाची एका पक्षाची हुकूमशाही मोडीस काढण्यासाठी परिवर्तन घडवून आणण्यासाठी संतोषसिंह रावत यांच्या सारख्याच दमदार उमेदवाराला काँग्रेस पक्षाने  उमेदवारी द्यावी अशी मागणी केली.संतोष सिंह रावत यांना उमेदवारी मिळाल्यास वलनी येथील जनतेचे संतोष सिंह रावत यांना समर्थन असल्याचे बैठकीत जनतेनी सांगितले.


बैठकीमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी प्रशांत उराडे,पवन निलमवार, रविभाऊ सूत्रपवार,इंदरशहा मेश्राम, नवनाथजी कुमरे,संगीताताई मेश्राम, बाळू कोटनाके,प्रमोद सोयाम,देविदास आत्राम, राकेश सोयाम,अरविंद सोयाम,मधुकर पेंदाम तसेच वलनी येथील नागरिक वमोठ्या संख्येने बैठकीत उपस्थित असल्याचे मूल तालुका काँग्रेस कॅमेटीचे अध्यक्ष गुरु भाऊ गुरूनूले कळवितात.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !