देऊळगाव येथे जेष्ठ महिलांचा तसेच विधवा महिलांचा सत्कार.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
आरमोरी : जेष्ठ नागरिक दिना निमित्त तसेच नवरात्र उत्सव निमित्त देऊळगाव येतील सार्वजनिक सभामंडपात जेष्ठ महिला तसेच विधवा महिलांचा सत्कार समारंभाचे आयोजन मुळ गाव देऊळगाव येतील व सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असणाऱ्या प्रसिद्ध साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल यांनी केले.
गावातील ऐंशी वर्षावरील जेष्ठ विधवा महिला तसेच गावातील विधवा महिलांच्या विषयी आपुलकी ठेवून तसेच समाजात त्यांना मानाचे स्थान मिळावे यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.सर्व प्रथम महापुरुषांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष देऊळगाव येतील पोलिस पाटील नास्तिक पंधरे, विशेष अतिथी प्रतिष्ठीत नागरिक वासुदेव कोल्हे,कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मोहन देशमुख, प्रमुख पाहुणे म्हणून रेमाजी बावणे,
अंगणवाडी सेविका ताराबाई खुणे, राकेश खुणे ,प्रतिष्ठित नागरिक उमाजी पाटील खुणे, जास्वंदा गावळे, देऊकाबाई गावळे, गोपाल खुणे, प्रमोद कुमरे, रामदासजी खुणे, संतोष ठलाल प्रामुख्याने उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांनी ऐंशी वर्षावरील जेष्ठ विधवा महिलांना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला तसेच उपस्थित विधवा महिलांना पुष्पगुच्छ, वस्त्रदान देऊन त्यांचा सत्कार केला.
त्यावेळी उपस्थित असलेल्या जेष्ठ विधवा महिला व इतर विधवा महिला देमाबाई ठलाल,सितकुराबाई ईस्कापे,जाईबाई मुर्तवतकार, लक्ष्माबाई मडावी, भागरता उईके, तसेच देऊळगाव येतील बहुसंख्येने महिला, पुरूष उपस्थित होते. देऊळगाव येतील प्रगती सार्वजनिक महिला मंडळ यांनी सहकार्य केले तसेच देऊळगाव वासियांनी सहकार्य केले.विशेष सहकार्य नानाभाऊ नाकाडे यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन आणि प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार भारत मेश्राम यांनी मानले.