जन शिक्षण संस्थान,गडचिरोली द्वारा विविध ठिकाणी महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती साजरी.

जन शिक्षण संस्थान,गडचिरोली द्वारा विविध ठिकाणी महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती साजरी.


सुरेश कन्नमवार ! मुख्य संपादक !एस.के.24 तास


गडचिरोली : दिनांक 02 ऑक्टोबर 2024 रोज बुधवार ला जन शिक्षण संस्थान, गडचिरोली कौसल्य विकास व उद्योजगता मंत्रालय, भारत सरकार पुरुस्कृत यांच्या सभागृहात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूरशास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.  



सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. केशव आर.चव्हाण संचालक जन शिक्षण संस्थान गडचिरोली हे होते. तसेच मा. श्री. गजानन अलोणे कार्यक्रम अधिकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तसेच कार्यालयीन कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूरशाश्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व द्विप्रज्वल  करून करसण्यात आली. 


यावेळी कार्यक्रम,अधिकारी गजानन अलोणे यांनी महात्मा गांधी व लाल बहाद्दूरशाश्त्री यांच्याविषयी मार्गदर्शन केले. गांधी हे एक विचारधारा आहेत हे पूर्वी होती, आहे, आणि पुढे राहणार असे ते म्हणाले.मा.श्री.केशव चव्हाण संचालक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य काळातील योगदान बाबत प्रकाश टाकला. 


महात्मा गांधी यांनी अहिंसा व सत्य यांच्या मार्गाने भारत देशाला स्वतंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले कार्याला उजाळा दिला. असहकार चळवळ,चले जावं,मिठाचा सत्याग्रह दांडी यात्रा स्वदेशी वस्तूचा वापर व परदेशीं मालाचा बहिष्कार असे अनेक चळवळ च्या माध्यमातून भारत देशाला ब्रिटिशांच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळवून दिले. 


लाल बहाद्दूर शात्री भारताचे दुसरे पंतप्रधान यांच्या जीवन चरित्रबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अभिजित कृष्णापूरकर यांनी केले तर आभार नितेश चौधरी यांनी मानले. यावेळी प्राची सातपुते, प्रशिक्षनार्थी उपस्थित होते. तसेच आज जन शिक्षण संस्थान,गडचिरोली यांच्या अंतर्गत जिल्हाभर विविध प्रशिक्षण केंद्रवार महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शात्री जयंती साजरी करण्यात आली. 


दिनांक 02 ऑक्टोबर निमित्य मा. श्री. केशव आर. चव्हाण संचालक JSS गडचिरोली यांच्या मार्गदर्शना खाली प्रशिक्षिका रुबीना सय्यद आणि खुशनुमा सय्यद  जन शिक्षण संस्थान, गडचिरोली  (ब्यूटी केयर आणि शिवणकला केंद्र बैच गेवर्धा तालुका कुरखेडा येथे महात्मा गांधी जयंती साजरी करण्यारण्यात आली. 


तसेच कडोली येथे सौदंर्य प्रशिक्षण केंद्र कडोली  च्या प्रशिक्षिका  श्रीमती भारती कोसरे यांनी महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी केली. तसेच कोरची तालुका येथे, सौन्दर्य प्रशिक्षण केंद्राच्या प्रशिक्षिका ममता सुखदेवे, रुपाली टेम्भूर्णे ह्या प्रशिक्षिका व प्रशिक्षनार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच धानोरा येथे प्रशिक्षिका सौ. पिंकी भैसारे, स्नेहल भैसारे, वेणू मशाखत्री सौदंर्य प्रशिक्षण केंद्र व शिवणकला केंद्रावर जयंती साजरी करण्यायत आली. 


सौन्दर्य प्रशिक्षण केंद्र आरमोरी येथे प्रशिक्षिका श्रीमती,मनिषा खोब्रागडे यांनी महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती साजरी कारण्यात आली. यावेळी  श्रीमती यामिनी मातेरे फिल्ड सहाय्यक व प्रशिक्षनार्थी उपस्थित होते.


गडचिरोली तालुक्यात सौन्दर्य केंद्र खरपूडी येथे सौ.शिल्पा तागडे यांनी महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. मा.श्री. केशव चव्हाण संचालक जन शिक्षण संस्थान गडचिरोली यांनी सर्व प्रशिक्षक व प्रशिक्षनार्थी यांचे आभार मानले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !