ही फक्त गर्दी नाही लाखो हाताने एकत्रित येत दिलेला आशीर्वाद आहे. - विरोधी पक्षनेते मान.विजय वडेट्टीवार.


ही फक्त गर्दी नाही लाखो हाताने एकत्रित येत दिलेला आशीर्वाद आहे. - विरोधी पक्षनेते मान.विजय वडेट्टीवार.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक.


ब्रम्हपूरी : दिनांक,२९/१०/२४ येत्या २० नोव्हेंबर २४ रोजी होऊ घातलेल्या विधानसभा मतदानासाठी ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी ब्रह्मपुरी ,सावली,सिंदेवाही या परिसरातून आलेल्या बहुसंख्य जनसमुदायाने विजय वडेट्टीवार यांच्या पाठीवर हात ठेवून त्यांना विधानसभा निवडणुकीचा नामांकन फॉर्म भरण्यासाठी हमखास विजयाची खात्री देण्यासाठी  अलोट गर्दी केली.



या गर्दीच्या रॅलीने भारावून जाऊन गर्दीला संबोधित करतांना उद्देशून म्हटले की, ही फक्त गर्दी नाही तर लाखो हात एकत्रित येऊन मला हमखास विजयासाठी दिलेला आशीर्वाद आहे.ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून बाबा का अर्ज दाखल केला.



अर्ज दाखल करण्यापूर्वी ब्रह्मपुरी शहरातून वाजत- गाजत बैल- बंडी वरती विराजमान झालेले विरोधी पक्ष नेते विजय भाऊ वडेट्टीवार आणि त्यांच्यासोबत असलेले छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल ,काँग्रेस तथा महाविकास आघाडीचे हजारो पदाधिकाऱीआणि ब्रह्मपुरी,सावली ,सीन्देवाही  येथून आलेल्या हजारो चाहते महारॅलीत सहभागी झाले होते.

सदर महारॅली ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पटांगण येथे आयोजित सभेच्या अफाट जनसमुदायाला गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेवराव किरसान यांनी मार्गदर्शन केल्यानंतर सभेच्या ठिकाणावरून निघून नामांकन अर्ज दाखल करण्याच्या तहसील ग्राउंड प्रशासकीय भवन येथे येऊन थांबली.


महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय भाऊ यांनी ब्रह्मपुरी येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात जाऊन आपला नामांकन अर्ज दाखल केला.


यावेळी काँग्रेस नेते मुन्ना ओझा, प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी ताई वडेट्टीवार , बल्लारपूर - मुल विधानसभा क्षेत्राचे उमेदवार संतोष सिंह रावत ,ऍडव्होकेट राम मेश्राम, संदीप गड्डमवार , प्राचार्य जगनाडे, हेमराज तिडके , प्रभाकर सेलोकर, डॉ राजेश कांबळे, विलास विखार ,प्रमोद चिमूरकर, एडवोकेट गोविंदा भेंडारकर आणि बरेच काँग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !