छल्लेवाडा येथे तथागत बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापणा सोहळा संपन्न.

छल्लेवाडा येथे तथागत बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापणा सोहळा संपन्न. 


मुनिश्वर बोरकर - गडचिरोली


अहेरी : अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथील बुद्ध विहारात पंचशिल बौध्द समाज मंडळ छल्लेवाडा च्या वतीने तथागत बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना पुज्य भदन्त डॉ. अभय नायक व भन्ते तिस्स बोधी नागपूर यांचे हस्ते पार पडले.कार्यक्रमाप्रंसगी भन्तेजीने त्रिशरण - पंचाशिला ग्रहण करून धम्मदेशना केली. 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भसारकर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अभारिप चे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत ' रिपब्लिकन पार्टी चे नेते प्रा. मुनिश्वर बोरकर ' रिपाई चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गोपाल रायपुरे ' सामाजीक कार्यकर्ता शुशीला भगत , गौतम मेश्राम , माजी मॅनेजर बबन राऊत , हंसराज उंदिरवाडे आदि लाभले होते . याप्रंसगी प्रा. मुनिश्चर बोरकर , गौतम मेश्राम , बबनराव राऊत शुशीला भगत आदिचे समायोचित भाषणे झालीत. याप्रसंगी रोहिदास राऊत म्हणाले की छल्लेवाडा येथील बुद्ध विहारातुन प्रेरणा घेण्यासारखी आहे. 


कारण या आदिवासी बहुल भागातील छल्लेवाडा गावातील विहारात बुद्ध मुर्तीच्या प्रतिष्ठापणेचा कार्यक्रम एवढ्या मोठ्या प्रमाणात होतो हि डॉ. बाबासाहेबाची देणच तर गोपाल रायपुरे.मार्गदर्शन करतांना म्हणाले बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था जिवंत ठेवुन कार्य करणे हिच खरी बाबासाहेबांना आंदराजली ठरणार आहे. 


बाबासाहेबांनी दसर्‍याच्या दिवशी दिक्षा दिली यामागे ऐतिहासिक दृष्टी ठेवून दिलेली दिक्षा हा राजा रावणाचा वधाचा इतिहास आहे. कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष मनोहर भसारकर , उपाध्यक्ष विलास बोरकर सचिव लक्ष्मण जनगम , प्रभाकर जुमडे , प्रभाकर दुर्गे , गाजाब देवगडे अनमोल बोरकर , सुनिल जनगम , आदिचे मोलाचे सहकार्य लाभाले.कार्यकमाचे संचालन विट्ठल भसारकर 'प्रास्ताविक तिरुपती दुर्गे तर आभार लक्ष्मण रत्नम यांनी मानले.कार्यक्रमास छल्लेवाडा येथील उपाषक व उपापिका बहुसंख्येनी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !