राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी.

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक       

           

ब्रह्मपुरी : दिनांक,०२/१०/२४ श्री.श्रावणजी बगमारे शिक्षण संस्था द्वारा संचालित डॉ. पंजाबराव देशमुख कन्या कनिष्ठ महाविद्यालय व डॉ.पंजाबराव देशमुख कॉन्व्हेन्ट ब्रह्मपुरी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रकाशराव बगमारे होते. 

 

प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रा.दिलीप जुंबडे, संस्थेच्या उपाध्यक्षा तथा  काॅन्व्हेंटच्या  प्राचार्या मनिषाताई बगमारे,  महाविद्यालयाच्या प्राचार्या शारदाताई ठाकरे उपस्थित होते.राष्टपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.  शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रकाशजी बगमारे यानी राष्ट्रपिता महात्मा गांधीचे कार्य जेव्हा पर्यंत चंद्र व सूर्य आहे तो पर्यंत गांधीचे विचार टिकणारे आहेत.त्यांनी सत्य अहिंसेच्या मार्गाने ब्रिटिशांविरोधात लढा दिला. 


त्यानंतर भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर काही महिन्यांनी म्हणजे ३० जानेवारी१९४८ रोजी महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली. व जय जवान जय किसानचा नारा देणारे देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नाव देशाच्या राजकीय इतिहासात साधे राजकारणी म्हणून घेतले जाते. लालबहादूर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी मुगलसराय येथे झाला. 


मूर्ती लहान पण किर्ती महान तसेच हरित क्रांतीचे जनक अशी त्यांची ओळख आहे. ते केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे आणि गृह मंत्री होते. जून १९६४ मध्ये जवाहरलाल नेहरूचे निधन झाल्यानंतर शास्त्री देशाचे दुसरे पंतप्रधान बनले. लाल बहादुर शास्त्री ९ जून १९६४ते ११ जानेवारी १९६६ म्हणजे मृत्युपर्यन्त ते पंतप्रधानपदी होते. १९६५ च्या भारत-पाक युद्धादरम्यान त्यांनी दिलेली 'जय जवान जय किसान ही घोषणा दिली होती. लालबहादूर शास्त्री यांचे निधन मात्र आकस्मित झाले होते.असे प्रतिपादन प्रा. प्रकाशजी बागमारे याने केले.

          

कार्यक्रमाचे संचालन कु.नूतन ठाकरे तर आभार निलिमा गुज्जेवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेकरीता श्री.गोवर्धन दोनाडकर, संजय नागोसे,निशा मेश्राम, वैशाली सोनकुसरे,प्रियंका करंबे, निशा गेडाम,ज्योती गुरुनुले,प्रतिक्षा निहाटे, विद्या आमले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !