कुर्झा वार्डात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव : संगीत भजन रजनी व गोपालकाल्याने समारोप.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रम्हपुरी : दिनांक,२२/१०/२४ येथील कुर्झा वार्डातील शिवाजी चौकात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला. सर्वप्रथम महाराजांच्या फोटोला हार टाकून अभिवादन करण्यात आले.
यावेळी वार्डातील डॉ.धनराज खानोरकर, रामकृष्णाजी खेत्रे,वाल्मिक बावनकुळे, संतोष कुर्झेकार, किशोर उराडे,राजू चिलबुले, नेपाल बावनकुळे,पुंडलिक खेडकर,सुभाष खेत्रे,मधुकर खेत्रे,अशोक उराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर रात्रो संगीत भजन रजनीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ऐसा है नाम तेरा,आया हू दरबार तुमारे,अरे रिकामा कशाला फिरतं?,दिल मन से गाऊंगा तेरा भजन इत्यादी महाराजांची भजने गाऊन जागरण करण्यात आले. गोपालकाला व आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाला वार्डातील अनेकांनी उपस्थिती दर्शविली.