अ-हेनवरगांव जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदार जागृतीसाठी चित्रकला व रांगोळी स्पर्धा.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक 20 नोव्हेंबर 24 रोजी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केली असून कोणताही मतदार मतदाना पासून वंचित राहता कामा नये यासाठी जाहिरात, प्रसार माध्यमे, शैक्षणिक संस्था याद्वारे मतदार जागृतीचा अभिनव उपक्रम राबवित आहे.
याचाच एक भाग म्हणून ब्रह्मपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अरे नवरगाव येथे मतदार जागृतीसाठी रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या चित्रकला व रांगोळी स्पर्धा कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक देवानंद तुलकाने तर प्रमुख अतिथी म्हणून संजय जराते, अमरदीप लोखंडे, पाथोडे सर, खरकाटे सर,मुन सर, ढोक मॅडम शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष, शाळेच्या शिक्षिका गावातील प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक तुलकाने सर यांनी उपस्थितांना मतदानापासून वंचित न राहता संविधानाने दिलेला मतदान करण्याचा अधिकार आलेली संधी वाया न दवडता स्वयं स्फूर्तीने मतदान करावे असे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मून सर त्याला आभार पाथर्डी सरांनी उपस्थितांचे मानले.