आल्लापल्ली वळणावर दोन दुचाकीच्या धडकेत ग्रामसेवक ठार.
अहेरी : तालुक्यातील आलापल्ली वळणावर दोन दुचाकीच्या सामोरासमोर झालेल्या जबर धडकेत रघुनाथ तुगे मुळमा वय,38 वर्ष रा कुकामेट्टा, ता. भामरागड यांचा उपचारार्थ रुग्णालयात हलवितांना मृत्यू झाला असून त्यांच्या निधनाने पंचायत समिती प्रशासनात शोककळा परतली आहे.
रघुनाथ मुळमा हे एटापल्ली तालुक्यातील घोडसुर ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते, ते (ता.१५ ऑक्टोंबर) मंगळवारी सायंकाळी 6 :00 वाजता दरम्यान एटापल्ली येथून स्वतःच्या दुचाकीवरून भामरागडच्या दिशेने जात होते, त्याच वेळी विरुद्ध दिशेने येणारी दुचाकीत समोरासमोर भीषण धडक झाली.
यात रघुनाथ मुळमा याच्या छाती व डोक्याला जबर मार लागला होता, त्यांना नागरिकांकडून उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले होते. चंद्रपूरला जात असतांना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला आहे.
रघुनाथ मुळमा यांच्या मृतदेहावर जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे उत्तरीय तपासणी केली जाऊन अंत्यविधीसाठी मृतदेह नातेवाहिकांना सुपूर्द करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास अहेरी पोलिसांकडून केला जात आहे.