स्वाती धनविजय हिला पदव्युत्तर मराठीमध्ये दोन गोल्ड मेडल.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील एम ए (मराठी)ची विद्यार्थिनी कु.स्वाती धनविजय हिला दोन गोल्ड मेडल गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात उपस्थित पाहूण्यांच्या हस्ते बहाल करण्यात आले.यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन,विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे,प्र-कुलगुरू डॉ श्रीराम कावळे उपस्थित होते.
महाविद्यालयातील मराठी विभागातील कु. स्वाती धनविजय ही प्रथम मेरिट तर कु.श्रध्दा डोईजड ही तृतीय मेरिट आली असून या दोन्ही विद्यार्थ्यींनींचे भरभरुन कौतुक संस्थेचे सचिव अशोक भैया, प्राचार्य डॉ डी एच गहाणे, उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकर, मराठी विभागप्रमुख डॉ धनराज खानोरकर, डॉ प्रकाश वट्टी, डॉ पद्माकर वानखडे,प्रा अस्मिता कोठेवार, डॉ सांगोळर, प्रा माधव चुटे, प्रा.प्रशांत राऊत व महाविद्यालयीन प्राध्यापकांनी व शिक्षकेतर कर्मचारींनी केले आहे.