कृष्णा भाऊ सहारे सारखा उमेदवार मिळणे बीजेपी ला कठीण.

कृष्णा भाऊ सहारे सारखा उमेदवार मिळणे बीजेपी ला कठीण.


कृष्णा भाऊ सहारेच देऊ शकतात ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात काट्याची टक्कर.


एस.के.24 तास


ब्रम्हपूरी : दिनांक,२२/१०/२४ सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले, लहानपणापासून कष्ट करून गोरगरिब मुलांच्या सहवासात राहून हमालकीच्या कामापासून  ते शेतातील निंदन ,खुरपण ,नांगर, वखर धरून शेती करून शिक्षण घेऊन आपल्या जीवनाचा राजकीय प्रवास करणारा


जनसामान्यांच्या तक्रारी,समस्या दूर करणारा आवाज,गोरगरिबांची दुःख जाणणारा,मोडक्या,तोडक्या झोपडी मध्ये जाऊन खाटेवर असणाऱ्या बिमाराची आपुलकीने चौकशी करणारा, प्रसंगी वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत करणारा, मृत कुटुंबीयांच्या मदतीला धावून जाणारा, शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडणारा शैक्षणिक ,सामाजिक क्षेत्रात अगदी हसत हसत सामील होणारा एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व म्हणजेच कृष्णा भाऊ सहारे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाचा मुकुट परिधान करणारा खरा नेता नांदगाव (जानी).


आजच्या बदलत्या परिस्थितीनुसार ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात ज्यांनी सतत दहा वर्षे आमदारकी पासून ते विरोधी पक्षनेता पद प्राप्त करणारे विजय भाऊ वडेट्टीवार यांना काट्याची लढत देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा  एक सक्षम नेता म्हणून कृष्णा भाऊ सहारे हे एकमेव उमेदवार आहेत.


कृष्णा भाऊ सहारे ची राजकीय कारकीर्द पाहू जाता ते सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळे चिमूर आणि ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य ही त्यांची लोकप्रियतेची खरी पावती आहे.


आणि त्यामुळेच ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील जनसामान्यांच्या भावनांचा आदर करून भारतीय जनता पार्टीने कृष्णा भाऊ सहारे यांना ब्रह्मपुरी विधानसभा जिंकायची असेल तर कोणत्याही प्रकारचा मनात संकोच न बाळगता कृष्णा भाऊ सहारे यांना ब्रह्मपुरी विधानसभेची तिकीट दिल्यास ब्रह्मपुरी विधानसभा निश्चितच जिंकू शकते असा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील जनतेचा सूर आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !