महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव (भोसले )येथे मतदान जनजागृती साठी रॅलीचे आयोजन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,२६/१०/२४ ब्रह्मपुरी तालुक्यातील महाराष्ट्र विद्यालय , पिंपळगांव (भोसले) विद्यालया च्या वतीने २० नोव्हेंबर २४ रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरापासून ते खेड्यापर्यंत मतदान जनजागृती कार्यक्रम शासन राबवित आहे.
त्याचाच एक भाग म्हणून मतदान जनजागृती करण्यासाठी विद्यालयाच्या वतीने गावात बँड पथकाच्या रॅली चे आयोजन करून प्रत्येक नागरिकांनी मतदान करावे असे या निमित्ताने सांगण्यात आले.बॅनर व पोस्टर तसेच फलक घोषवाक्य तयार करून संपूर्ण गावांत रॅली काढण्यात आली.
या प्रसंगी विद्यालया चे मुख्याध्यापक मान.ओमप्रकाश बगमारे सर,सचिन क-हाडे,रुपेश पुरी सर, श्री घ्यार सर,श्री महाले सर,श्री सडमाके सर,श्री महाजन सर,श्री मेश्राम सर,श्री नाकाडे सर,श्री गावडकर सर,अंशुल राऊत मॅडम उपस्थित होते.