भाजपा कडून ब्रम्हपुरी विधानसभेसाठी अविनाश पाल प्रबळ दावेदार ; जोरदार टक्कर होण्याची शक्यता.
एस.के.24 तास
सावली : राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकसाठी सर्वच पक्षाकडून उमेदवारीसाठी चढाओढ चालु असून भारतीय जनता पार्टी कडून ओबीसीचे खंदे समर्थक, पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते संपूर्ण क्षेत्रात दांडगा जनसंपर्क असलेले व विरोधकांवर मात करू शकतील असे मातब्बर नेते अविनाश पाल यांची प्रबळ दावेदारी समजली जात आहे.
त्यांचा पक्षाशी व भारतीय जीवन विमा निगम चे अभिकर्ते असल्याने त्यांचा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात दांडगा जनसंपर्क असून त्यांना आरोग्यदूत म्हणून ओळखले जातात, रात्री बेरात्री धावून जाणारे व सर्व जनतेसी आपुलकीने वागणारे, जनसेवेचे व्रत जोपासून दिन दुबळ्या, आर्थिक दुर्बल, वंचित घटकपर्यंत पोहचण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो, त्यामुळे त्यांची उमेदवारी पक्की समजली जात आहे, पक्ष त्यांच्या नावाचा नक्कीच विचार करतील असा विश्वास येथील कार्यकर्त्यांना आहे.