किसाननगर (व्याहाड) घरकुल लाभार्थी निवडणुकीवर बहिष्कार टाकणार !
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
सावली - सावली तालुक्यातील किसाननगर ( व्याहाड ) वासींय बहुसंख्य नागरिकांनी रमाई घरकुल योजनेतर्फे ग्राम पंचायत व्याहाड येथे अर्ज भरले सन २०२० मधे घरकुलही मंजुर झाले परंतु व्याहाड ग्रामपंचायत चे सरपंच व सचिव यांनी जाणीवपूर्वक गाव नमुना ८ वरती अतिक्रमणाची जागा दाखवून घरकुल मंजुर झालेला ठराव रद्द करून आमच्यावर हेतुपूर्वक अन्याय केलेला आहे. आम्ही घरकुल लाभार्थी अनेकदा विनंत्या . अर्ज करूनही आम्हाला घरकुलपासुन वंचित ठेवण्याचा काटोकाट प्रयत्न ग्रामपंचायत पदाधिकाऱ्या कडून होत आहे.
त्यामुळे आम्ही घरकुल लाभार्थी व रहिवासी सहीत होवु घातलेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असुन तश्या प्रकारचे निवेदन तहसिलदार सावली यांचेकडे दिलेले आहे. व त्याचप्रमाणे रिपाईच्या नेत्याकडे तझ्या प्रकारची निवेदन देऊन उपोषण करण्याची तयारी दर्शविली. रिपाईचे नेते गोपाल रायपुरे प्रा.मुनिश्वर बोरकर एड विनय बांबोळे यांचेकडे गाहाणी व तक्रार दिली.
तहसिलदार यांना निवेदन देतांना सुरेश पुरुषोतम बांबोळे,कालीदास मारोती सेमस्कर धनराज कोरेवार, टिलु मेश्राम , देवराव कोरेवार, राजाभाऊ फुलझेले ' ताराबाई नगराळे , सुशिला मेश्राम , सुर्यकला मेश्राम , प्रिया मेश्राम आदि सहीत बरेच घरकुल लाभार्थी उपस्थित होते.