गोंडवाना गणतंत्र पार्टीचा उमेदवार ठरला ; सोमवारी नामांकन भरणार.
★ रिपाईच्या घटक पक्षाचे सहकार्य लाभणार.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली - गोंडवांना गणतंत्र पार्टी जिल्हा गडचिरोली तर्फे गडचिरोली विधानसभा क्षेत्रासाठी अनुसुचित जमातीचे खबिर व झुंझार नेतृत्व योगेश बाजीराव कुमरे यांना गोंगपा तर्फे गोंगपा गडचिरोली जिल्हाध्यक्ष,प्रशांत मडावी यांनी योगेश बाजीराव कुमरें यांना उमेदवारी दिली आहे. गोंडवाना गणतंत्र पार्टीला रिपाईच्या घटक पक्षाचे सहकार्य लाभणार असुन योगेश कुमरे हे आपले नामाकंन अर्ज सोमवारी भरणार आहेत.
जारांवडी दोडदां येथील रहिवासी असूनआदिवासींचा समाज सेवक म्हणुन परिचित असुन त्यांचे वडील बाजीराव कुमरे हे जारावंडी जि. प क्षेत्रातून तिनदा निवडून आले होते.मुलनिवासी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे मध्यप्रदेश ' छतीसगड मधे आमदार आहेत.
धानोरा जि.प क्षेत्रातुन गोगपाचा उमेदवार निवडून आला होता तर राजे धर्मराव बाबा आत्राम सुद्धा पहिल्यांदा गोंडवाना गणतंत्र पार्टीकडून आमदार झाले होते. आदिवासी बांधवांचा मुख्य पक्ष गोंडवाना असल्यामुळे मी गोंगपाची निवड करुन उमेदवारी अर्ज भरणार आहे असे योगेश बाजीराव कुमरे यांनी सांगीतले.