चंदू बेझेलवार ! तालुका प्रतिनिधी,भामरागड
भामरागड : दिनांक 5/10/2024 रोज शनिवार ला डासजण्य स्थानिक रोग निर्मूलन प्रकल्प फॅमिली हेल्थ इंडिया च्या वतीने EMBED FHI गडचिरोली अंतर्गत भामरागड तालुका अंतर्गत मन्ने राजाराम प्राथमिक आरोग्य केंद्र येचली इथे शारदा माता मंडळ यांच्या परवानगी ने प्रत्यक्ष आरती च्या वेळेस जमलेल्या समस्त गावकरी मंडळी ना मोडुल बॅनर व स्पीकर च्या मदतीने डेंग्यू मलेरिया या आजारा विषयी तेलुगू गोंडी व माळीया भाषेत जनजागृती करण्यात आली.
आठवड्यात एक दिवस कोरडा पाळणे त्यासाठी घरातील सर्व भांडे व पाण्याची सर्व साठे निर्जंतुक करने त्याच सोबत डेंगू व मलेरिया आजाराची लक्षणे डोके दुखी उल्टी थंडीने ताप,मळमळ,ताप जाणे येणे असे काही लक्ष्णे दिसल्यास त्वरित आशाताई किंवा जवळच्या दवाखान्यात जाऊन रक्ताची तपासणी करून घ्यावी असे सांगण्यात आले.
तर या साठी सहकार्य म्हणून सहभागी झालेले कर्मचारी CNAM आरती धूर्वे,आशा गतप्रवर्तक, आशा ताई मीना झाडे,सरपंच,गावकरी मंडळी उपस्थित होते तर BCCF रवींद्र दुर्गे यांनी ही सर्व माहिती फॅमिली हेल्थ इंडिया च्या वतीने दिली, तर खऱ्या अर्थाने नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी लोक कल्याणकारी उपक्रम रवींद्र दुर्गे सामाजिक कार्यकर्ते यांनी हाती घेतले.