मुलचेरा तालुक्यातील शेतात गळफास घेऊन प्रेमी युगुलाने संपवली जीवनयात्रा.



मुलचेरा तालुक्यातील शेतात गळफास घेऊन प्रेमी युगुलाने संपवली जीवनयात्रा.


एस.के.24 तास


मुलचेरा : न कळत्या वयात जुळलेल्या प्रेम प्रकरणात एका नवतरुण प्रेमीयुगलाने शेतातल्या झोपडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना मुलचेरा तालुक्यातील लक्ष्मीपूर येथे रविवारी घडली. लग्नाला घरातून विरोध असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.


जयदेब मिलन मंडल वय,20 वर्ष,रा.लक्ष्मीपूर) आणि अमेला अमित रॉय वय,18 वर्ष, रा.विजयनगर) अशी त्या तरुण-तरुणींची नावे आहेत. गावालगत असलेल्या शेतातील झोपडीत त्यांचे एकाच दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले. ही घटना वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.


माहिती मिळताच मुलचेरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दोघांच्या मृतदेहाचे मुलचेराच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अमेला ही तरुणी विजयनगर येथील रहिवासी असून ती बारावीत शिकत होती,तर जयदेव याने बारावी नंतर शिक्षण सोडल्याची माहिती आहे.


हे दोघेही गांधीनगरच्या शाळेत शिकले आहेत. वर्ग वेगवेगळे असले तरी शाळा एकच होती. तिथेच त्यांचे सूर जुळल्याचे समजते. शनिवारच्या मध्यरात्री अमेला घरून बाहेर पडली. विजयनगर ते लक्ष्मीपूर या दोन गावातील अंतर जवळपास 5 किलोमीटर आहे. त्याचवेळी ती जयदेब याला भेटली आणि त्या दोघांनी याजन्मी नाही, तर पुढच्या जन्मी एकत्र राहू, असा विचार करून एकत्रितपणे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !