ग्रामपंचायत कार्यालय हे विकासाचे केंद्र बनावे. - नितीन गोहने ★ कवठी येथील नव्या ग्रामपंचायत भवनाचे थाटात उदघाटन ; विरोधि पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांचे फलित.

ग्रामपंचायत कार्यालय हे विकासाचे केंद्र बनावे. - नितीन गोहने


कवठी येथील नव्या ग्रामपंचायत भवनाचे थाटात उदघाटन ; विरोधि पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांचे फलित.


एस.के.24 तास


सावली : तालुक्यातील मौजा.कवठी येथील जनसुविधे अंतर्गत प्र.मा. २० लक्ष रुपयाचा नवीन ग्रामपंचायत भवनाचे उदघाटन सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने यांचा हस्ते करण्यात आले.नव्या ग्रामपंचायत भवनासाठी ग्रामपंचायत कमेटी,ग्राम काँग्रेस कमिटी,गावकरी तसेच सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे मागणी केली होती.


त्यांनी जनसुविधे अंतर्गत २० लक्ष रुपये मंजूर केले.आज नव्या ग्रामपंचायत भवनाचे थाटात उदघाटन पार पडले,याप्रसंगी उदघाटक म्हणून उपस्थित लोकांना मार्गदर्शन करताना तालुका अध्यक्ष नितीन गोहने यांनी ग्रामपंचायत भवन हे ग्राम विकासाचे केंद्र बनावे व युवकांनी गावाच्या देशाच्या विकासासाठी पुढाकार घेत आपला गाव आपला देश  सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन केले.तर गट विकास अधिकारी मधुकर वासनिक यांनी   गावाचा सर्वांगिण विकासासाठी भरपूर निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.


याप्रसंगी विस्तार अधिकारी परसावार साहेब, माजी सभापती प.स. विजय कोरेवार, सरपंच कांताबाई बोरकुटे, उपसरपंच राकेश घोटेकार, पो.पाटील सचिन सिदाम, त.मू.स अध्यक्ष टिकाराम म्हशाखेत्री, शा.व्य.स अध्यक्ष यशवंत भोयर,प्रशांत भोयर सदस्य पो.पाटील रुद्रापुर, शांताबाई बोरकुटे ग्रा.प सदस्य,तसेच कर्मचारी अंगणवाडी सेविका, आशासेविका, गावकरी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !