ए.पि.आय.शितल खोब्रागडे व मेजर अरुण पिसे यांनी केले.
★ जि.प.प्रा.शाळा,अ-हेरनवरगांव येथील विद्यार्थी,विद्यार्थीनीना बाल लैंगिक अत्याचार व संरक्षण या विषयी मार्गदर्शन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,२६/१०/२४ पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले पोलीस स्टेशन,ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा , अ-हेरनवरगांव येथे बालकांच्या लैंगिक अत्याचाराने होणारे शोषण व त्या होणा-या अपराधा पासुन बालकांनी स्वतः करावयाचे संरक्षण या विषयी इयत्ता १ ते ४ च्या शालेय विद्यार्थी - विद्यार्थिनींना अनेक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी विचारपिठावर ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षीका शितल खोब्रागडे, पोलीस अंमलदार अरुण पिसे, पोलीस शिपाई विशाल झोडे मुख्याध्यापक देवानंद तुलकाने, अमरदीप लोखंडे उपस्थित होते.कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणुन सहाय्यक पोलिस निरीक्षीका शितल खोब्रागडे यांनी विद्यार्थ्यांना पोस्को कायदा हा बाल लैंगिक अत्याचार यावर आळा घालण्यासाठी भारत सरकार द्वारे तयार करण्यात आला आहे.
जर एखाद्या अनोळखी व्यक्तीने आपल्याला आमीष दाखवून छेडखानी करण्याचा, नको त्या ठिकाणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर मनात कोणत्याही प्रकारची भीती , संकोच न बाळगता वर्गशिक्षक, मित्र, मैत्रिणी, आई - वडील यांना लगेचच माहिती द्यावी जेणेकरून आई- वडील पोलीस स्टेशनच्या 112 क्रमांकावर फोन करू शकतील आणि अपराध्याला पकडण्यासाठी पोलिस विभागाला अवघड जाणार नाही.
पोलीस अंमलदार अरुण पिसे यांनी विद्यार्थी,विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की, कोणत्याही अनोळखी स्त्री- पुरुषाने चॉकलेट , बिस्कीट देण्याचा प्रयत्न केला तर ते घेऊ नये. रस्त्याने चालत असताना एखाद्या टू व्हीलर, फोर व्हीलर वाहन चालकाने आपणांस बसण्याचा आग्रह केला तर बसू नका कारण आज लहान मुलांना पळवून नेणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. वर्गात ,वर्गा बाहेर आई - वडील , गुरुजनांशी, इतर कोणाशीही खोटे बोलू नका. नेहमी खरे बोला.
आपल्या सोबत जर एखादा अनुचित प्रकार घडला तर तो प्रकार दडवून न ठेवता शिक्षक , मुख्याध्यापक मित्र- मैत्रिणी यांना लगेच सांगावे अशा प्रकारचे विचार मार्गदर्शनातून व्यक्त केले. मुख्याध्यापक तुलकाने यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना जागरूक राहण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाथोडे सर तर उपस्थितांचे आभार मून सर यांनी व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षिका यांनी मोलाचे सहकार्य केले.