इंडिया आघाडी ची उमेदवारी संतोष रावत याना ?

इंडिया आघाडी ची उमेदवारी संतोष रावत याना ?


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात इंडी आघाडीची उमेदवारी मंगळवारी सायंकाळी शिवसेना उबाठा ला जवळपास जाहीर झाल्याची वार्ता बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात येऊन धडकली होती आणि शिवसेना उबाठा मध्ये आनंदाची लहर उठली होती.परंतू रात्रभरात बैठकीचा दौर असा चालला की पहाटे पहाटे ही उमेदवारी काॅंग्रेसच्या गोटात गेली आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष,संतोष रावत यांना जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली.


खरेतर काॅंग्रेस वा महाविकास आघाडी किंवा इंडी आघाडीत शेवटच्या क्षणापर्यंत नेमकं काय घडेल हे दस्तुरखुद्द कोणत्याही पक्षाध्यक्षांनाही माहित नसते ,ही बाब आघाडीत सगळ्यांनाच ठाऊक आहे. तरीही अंतस्थ गोटातील सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील कोणतीही जागा शिवसेना उबाठा गटाला मिळणार नसून केवळ चंद्रपूर वगळता उर्वरित पाचही जागा काॅंग्रेसच्या वाट्याला गेल्याची माहिती आहे.


बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत आणि तेंव्हापासून आपल्यासाठी पायाभरणी करीत असलेल्या धडाडीच्या कार्यकर्त्या डॉ.अभिलाषा गावतुरे यांच्या पदरी निराशाच पडणार अशी शक्यता बोलून दाखवली जात आहे , आणि म्हणूनच त्या बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची चर्चा असली तरी त्या अशी भूमिका घेणार नाही अशीही खात्रीलायक माहिती पुढे आली आहे,तर शिवसेना आणि शिवसैनिक आपला स्वतंत्र निर्णय घेऊ शकतील अशीही चर्चा जोरकसपणे पुढे येत आहे.


याचा अर्थ भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात काँग्रेसचे संतोष रावत आणि बरेच अपक्ष उमेदवार आपली संपूर्ण शक्ती पणाला लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


निवडणुकीच्या समरांगणात घोडा-मैदान आता जवळ असल्याने लवकरच कोण किती वेगाने पळणार आणि कुणाची घोडदौड सुरू राहणार आणि कुणाला लगाम लागणार याबाबत जनता लक्ष ठेवून असणार आहे. आम्ही तर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणारी आहोत पण…तुम्हाला काही लक्षात आलंच तर तुम्हीही लक्ष ठेवून असालच यांची आम्हाला खात्री आणि विश्वास आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !