माझ्या सारख्या विकासाच्या महामेरुला भाजपा डावलत असेल तर मी अपक्ष उमेदवार म्हणुन राहीन.
★ भाजपाकडूनच आज उमेदवारी अर्ज भरला. - आमदार डॉ.देवराव होळी
गडचिरोली मुनिश्चर बोरकर
गडचिरोली - भाजपाचे आमदार डॉ.देवराव होळी यांनी आज दि. २५ ऑक्टोबरला वासेकर ( अभिनय )लॉन येथे शक्ती प्रदर्शन केले व भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्याना सांगीतले कि, गेल्या ६० वर्षात कांग्रेसने गडचिरोली जिल्ह्याचा विकास केला नाही तो मी माझ्या १० वर्षाच्या आमदारकीच्या काळात गडचिरोली जिल्हयाचा विकास केला हे सार्या जनतेला माहीत आहे, परंतु भाजपा मधीलच काही मंडळी मला तिकीट मिळू नये म्हणुन वरीष्ठ नेत्यांकडे तक्रारी केल्यात व मला तिकीट मिळू नये म्हणुन माझे जिल्ह्यातील विरोधक मंडळी कट रचत आहेत.
परंतु माझे वरीष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी , अमित शहा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदिवर माझा विश्वास आहे . मलाच तिकीट देतील अश्या प्रकारचे मार्गदर्शन डॉ. देवराव होळी यांनी केले.त्यानंतर त्यांचा जुलुस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघाला ते थेट उपविभागीय अधिकारी गडचिरोली यांच्या कार्यालयाकडे भाजपाच्या डॉ. देवराव होळी यांचा जुलुस बैलबंड्या ' ढोल तासे व डॉ. देवराव होळी हे आपल्या कार्यकर्ता सोबत ट्रकवर होते .