हत्ती सोबत सेल्फी काढने आले जिवावर अलगट ; टस्कर हत्तीने हल्ला करून मजुराला चिरडून केले जागीच ठार.
★ चामोर्शी तालुक्यात गडचिरोली वनविभागातील कुनघाडा (रै)आबापूर जंगलात.
सुरेश कन्नमवार ! मुख्य संपादक !
चामोर्शी : रानटी टस्कर हत्तीसोबत सेल्फी काढण्याचा नाद एका मजुराच्या जिवावरच बेतला.टस्कर हत्तीने हल्ला करून या मजुराला चिरडून जागीच ठार केले. ही घटना चामोर्शी तालुक्याच्या आबापूर जंगलात आज सकाळी 8:30 वा.सुमारास घडली.
श्रीकांत रामचंद्र सतरे वय,23 रा.नवेगाव, भुजला,ता.मुल जि.चंद्रपूर असे ठार झालेल्या मजुराचे नाव आहे. गडचिरोली जिल्ह्यात केबल टाकण्याचे काम करण्याकरिता नवेगाव येथून श्रीकांत सतरे हे आपल्या काही सोबत्यांसह आले होते. गडचिरोली वनविभागातील कुनघाडा रै. वन परिक्षेत्रांतर्गत आबापूर गाव परिसरातच हे काम सुरू होते.
दरम्यान 23 ऑक्टोबर रोजी चातगाव व गडचिरोली वन परिक्षेत्रातून रानटी टस्कर हत्तीने कुनघाडा रै. वन परिक्षेत्रात प्रवेश केलेला होता. नियत क्षेत्र मुतनूर वनक्षेत्रातील आबापूर जंगलात टस्कर हत्ती वावरत असल्याची माहिती केबल टाकणाऱ्या मजुरांना मिळाली व त्यापैकी तिघेजण हत्ती पाहायला गुरुवारी सकाळीच गेले होते.
पळ काढल्याने वाचला दोघांचा जीव हत्ती दूरवरच असताना श्रीकांत हा हत्ती सोबत सेल्फी काढण्यात मग्न असतानाच हत्तीने हल्ला करून त्याला चिरडले.तोपर्यंत अन्य दोघेजण तेथून पळ काढत आपला जीव वाचविण्यात यशस्वी झाले. हे मजूर केबल टाकण्याचे काम करण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात आले होते.