६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन पोटेगाव येथे साजरा.
एस.के.24 तास
गडचिरोली : भिमज्योती बहुउद्देशिय संस्था पोटेगांव येथे ६८ वा धम्मचक्र दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष,भोजराज कान्हेकर बामसेफ जिल्हाध्यक्ष होते.प्रमुख मार्गदर्शक प्रमोद राऊत एम.एन. टिव्ही चॅनल जिल्हा प्रभारी,विनोद मडावी कार्याध्यक्ष आझाद समाज पार्टी, प्रा.छन्नालाल फुलझेले,डॉ.भारत रंगारी होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष,भोजराज कान्हेकर म्हणाले की, बुद्ध धम्म हा दुःख मुक्तीचा धम्म आहे.या धम्माने जगातील दुःख मुक्त होते त्यामुळेच जगात बुद्ध धम्म मोठ्या प्रमाणात वाढला.प्रमोद राऊत म्हणाले की या जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे.हा धम्म स्वातंत्र्य ,समता,बंधुता व न्यायावर आधारित आहे.
विनोद मडावी म्हणाले की,ज्या समाजाचा राजा तो समाज ताजा.बहुजन समाजाला ताजा करायचा असेल तर बहुजन समाज राजा झाला पाहिजे.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून मंडळाची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली.भिमज्योती बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष,आदित्य रंगारी,उपाध्यक्ष कल्पना फुलझेले,कोषाध्यक्ष मिना रंगारी,सचिव प्रतिमा मेश्राम,सहसचिव संगिता मुंजमकार,सदस्य पंकज रामटेके ,सिद्धार्थ गोवर्धन ,प्रणय रंगारी , देवाजी कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली.नवनियुक्त पदाधिकाऱ्याना जयभिम ची टोपी व पंचशील दुपट्टा देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्वजारोहण करून पंचशिल व त्रिशरण ग्रहण करण्यात आले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दिवाकर फुलझेले , विलास गोवर्धन,शंकू पोटावी, पि.के.मडावी, रामदास शेरकी,जगदिश गेडाम, देवाजी गेडाम,आकाश मडावी, विजय बांबोळे,मनोहर पोटावी यांनी प्रयत्न केले.
भोजनदान मनोज मालाकार यांचे कडून देण्यात आले . या कार्यक्रमाचे संचालन,ज्ञानेश्वर मुंजमकार यांनी केले. प्रास्ताविक,प्रतिमा मेश्राम यांनी केले तर आभार डॉ. विजय रामटेके यांनी मानले.