ब्रम्हपुरी विधानसभा जिंकण्याचा संकल्प करा. - मा.खा.अशोकजी नेते
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
ब्रम्हपुरी : भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस - रिपब्लिकन पार्टी (आ ) महायुतीचे अधिकृत उमेदवार .कृष्णाभाऊ सहारे यांचे ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात आजच्या शेवटच्या दिवशी यांचा नामांकन अर्ज दाखल झाल्यावर माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तसेच सहसंयोजक विधानसभा निवडणूक संचालन समिती महाराष्ट्र राज्य अशोकजी नेते यांनी राजस्थानी हाँल ब्रम्हपुरी येथे भाजपा- महायुतीचे अधिकृत उमेदवार कृष्णाभाऊ सहारे यांचे पुष्पगुच्छाने स्वागत व विजयी भव असे अभिनंदन केले.
ब्रम्हपुरी राजस्थानी हाँल येथे आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्ता यांना मार्गदर्शन करतांना मा.खा.अशोकजी नेते यांनी म्हणाले निवडणूक ही पैशाच्या भरोशावर लढवली जात नाही तर विकासाभिमुख कामे करून विकासात्मक व जनतेच्या हिताचा दृष्टीकोन ठेऊन काम केले पाहिजे. आता परीक्षेची वेळ आहे ह्या परिक्षेत पास होण्यासाठी कार्यकर्ते यांनी जोमाने कामाला लागावे.
मी माझ्या कार्यकाळामध्ये अनेक विकासाभिमुख कामे केलेली आहेत.ज्यात रेल्वेचा प्रश्न असेल असेल,कोटगल, चिचडोह, असा सिंचनाच प्रश्न असेल, आरोग्याच्या दुष्टीने मेडिकल कॉलेज,रस्त्यांची कामे,नँशनल हाँयवेची कामे असे अनेक विकासाभिमुख कामे मार्गी लावलेले आहेत. लोकसभेत काँग्रेस नी संविधान समोर आणुन व महिलांच्या खात्यात महीन्याला रोख रक्कम साडेआठ हजार रुपये देऊ असे अनेक मुद्दे समोर आणून खोटा अपप्रचार करण्यात आला.पण आता खोटया अप प्रचाराला जनतेनी बळी पडु नये.लोकसभेत आपण केलेल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त करतो.
महिलांच्या सन्मानासाठी अतीशय महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली महिलांना आज दिड हजार रुपये मिळत आहेत व पूढेही मिळणार भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार कृष्णाभाऊ सहारे ब्रम्हपुरी विधानसभेतून नक्कीच विजयी होईल असा संकल्प कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी करावा.असे प्रतिपादन या बैठकी दरम्यान मा.खा.अशोकजी नेते यांनी केले.
यावेळी बैठकीला मंचावर प्रामुख्याने मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री मान. हंसराजजी भैय्या अहीर, माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर,माजी बांध सभापती संतोष भाऊ तंगडपल्लीवार, ओबीसी मोर्चा चे प्रदेश सचिव प्रकाशजी बगमारे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अविनाश भाऊ पाल,महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ.वंदनाताई शेंडे
शहराध्यक्ष अरविंद भाऊ नांदुरकर,माजी जि.प.सदस्य संजयजी गजपुरे,तालुकाध्यक्ष अरुणजी शेंडे,युवा नेते तनयजी देशकर, तालुकाध्यक्ष अर्जुनजी भोयर, माजी सभापती रामलालभाऊ दोनाडकर, ता.महामंत्री सचिनभाऊ तंगडपल्लीवार, श्रीकांत भुगूवार,नानाजी तुपट,मनोज भुपाल, साकेत भानारकर,देवा म़ंडलवार,अंकुश भोपये तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.