भिम सैनिकाचे राष्ट्रीय अधिवेशन ११ ला नागपुरात.
मुनिश्वर बोरकर ! कार्यकारी संपादक
नागपूर : पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या वतीने भिम सैनिकाचा ४४ वा राष्ट्रीय अधिवेशन दि. ११ ऑक्टोंबर २०२४ ला सांयकाळी ५ वाजता आय टी आय मैदान दिक्षाभुमी जवळ श्रद्धानंदपेठ नागपूर येथे आयोजीत करण्यात आलेला आहे.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष,जागतिक लॉग मार्च चे प्रणेते भीम सैनिकाचे सरसेनापती प्रा.जोगेंद्र कवाडे हे राहणार असुन विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे तर प्रमुख अतिथी म्हणून
पिरिपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेशभाई उन्हवणे मुंबई , कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश चरणदासजी इंगोले अमरावती राष्ट्रीय महासचिव ॲड . जे के नारायणे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष गणेशभाई पडधन राज्य अध्यक्ष जगनभाई सोनवणे , जेष्ठ नेते प्रा. ई.मो .नारनवरे , मुंबई प्रदेश अध्यक्ष विजय वाघमारे , राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण तर स्वागताध्यक्ष कैलास बोंबले आदिची उपस्थिती लाभणार आहे.
तरी होवू घातलेल्या भिम सैनिकाच्या मेळाव्यास गडचिरोली जिल्ह्यातुन बहुसंख्य पिरिपाचे कार्यकर्ते उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर . कार्याध्यक्ष मुरलीधर भानारकर जिल्हा उपाध्यक्ष मारोती भैसारे , सोनुजी साखरे ,पांडुरंग ढेभुर्ण , प्रमोद सरदारे , शामराव सहारे ' राजेंद्र ठवरे , अमोल लाळे , संतोष खोब्रागडे , देवेंद्र बोदेले , प्रशांत मेश्राम , अशोक बावणे , दुधराम सहारे , जिवन मेश्राम रोशन उके ' दिनेश नंदेश्वर , बंडु कुळवे , डॉ. गलबले ' कविश्वर झाडे , डॉयमॅड वाकडे आदिनी केलेले आहे.