डॉ.रामकृष्ण मडावी यांचे हस्ते रुबी हेल्थ केअर प्रतिष्ठानचे उद्घाटन.
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
गडचिरोली : सध्याचा काळ अत्यंत व्यस्ततेचा व धावपळीचा आहे.लोकांचे या धकाधकीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे.सकस आहार,पुरेसा व्यायाम व झोप यांच्या अभावाने आज सर्वजण विविध आजारांनी त्रस्त झाले आहेत.
आहारात नैसर्गिक संसाधनांचा पुरेपूर वापर करून आरोग्य सुदृढ करता येते.आपल्याकडे वापरात येणाऱ्या बाजारातील खाद्य अनेक प्रक्रिया केलेल्या असल्याने तेलातील पोषक तत्व नष्ट होते व या तेलाचे सेवन केल्याने त्याचा आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतो.
अशावेळी कुठलीही प्रक्रिया न केलेले व नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले कच्च्या घाणीचे तेल आहारात वापरल्याने स्वास्थ्य निकोप राखणे नक्कीच शक्य आहे असे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ.रामकृष्ण मडावी यांनी केले.गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठासमोर नव्याने सुरू झालेल्या रुबी हेल्थ केअर कच्च्या घाणीचे खाद्यतेल प्रतिष्ठानच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
आजच्या धावपळीच्या जगात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास बऱ्याचदा असमर्थ ठरतो.लाकडी घाणीचे तेलही आरोग्यदायी आहे.परंतु ते तयार करताना त्यात पाण्याचा वापर करावा लागतो.त्यामुळे त्या तेलात आर्द्रता राहते तेल अधिक काळ टिकू शकत नाही. परंतु रूम टेंपरेचरवर कोल्ड प्रेस्ड मशीनद्वारे नैसर्गिकरीत्या काढलेल्या थंड तेलात संपूर्ण पोषक तत्व कायम असतात.त्यामुळे हे तेल खाण्यास सर्वोत्तम व आरोग्यदायी आहे.या तेलामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढीस लागते.हे तेल शरीरातील वात,कफ व पित्त या तिन्ही दोषांना नियंत्रित करते.
त्यामुळे पंचक्रोशितील जनतेचे सुदृढ आरोग्य राखण्यासाठी आपण हा कच्च्या घाणीच्या तेलाचा प्रकल्प गडचिरोली शहरात सुरू केला.याचा जनतेने पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन या प्रतिष्ठानचे प्रमुख डॉ.प्रकाश नारायण मेश्राम आणि जया प्रकाश मेश्राम यांनी केले.
शेंगदाणा,जवस,सूर्यफूल, करडई,मोहरी, तीळ ई.पासून नैसर्गिक पद्धतीने बनवलेले तेल उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थितांनी प्रतिष्ठानचे आभार मानले.या प्रसंगी परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.