विवेकानंद नगर राजुरा येथे महात्मा गांधी,लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त श्री.गुरुदेव सेवा मंडळ यांनी केले अभिवादन.
राजेंद्र वाढई ! उपसंपादक
राजुरा : हनुमान मंदिर विवेकानंद नगर राजुरा येथे तुकडोजी महाराज रचित सामुदायिक प्रार्थना घेऊन सत्य आणि अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकिशोर वाढई, सरपंच कळमना व जिल्हाध्यक्ष सरपंच संघटना जिल्हा चंद्रपूर तसेच मार्गदर्शक म्हणून मोहनदास मेश्राम,सेवाधिकारी, श्रीगुरुदेव सेवा मंडळ, तालुका राजुरा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकिशोर वाढई जिल्हाध्यक्ष सरपंच संघटना जिल्हा चंद्रपूर यांनी गावाचा विकास करायचा असेल तर पवित्र , निर्मळ व निस्वार्थ भावनेने गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य केले तरच खऱ्या अर्थाने सेवा मंडळाचे कार्य वाढीस लागेल व गावात समता, बंधुता, व न्याय ही मूल्य रुजली जातील असे मत आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले. प्रमुख मार्गदर्शक तालुका सेवाधिकरी मोहनदास मेश्राम यांनी पूज्य महात्मा गांधींजिंच्या सत्य,अहिंसा,सत्याग्रह या तत्वाची व महापुरुषाचे विचार समाजात रुजवण्याची आज नितांत गरज आहे असे मत व्यक्त केले.
तसेच नवनियुक्त तालुका कार्यकारिणीतील पदाधिकारी यांचा गुरुदेव सेवा मंडळ विवेकानंदनगरच्या वतीने सत्कार करण्यात आला व पुढील कार्य निःस्वार्थ भावनेने करण्यास शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाला ग्रामगीताचार्य मारोती सातपुते, नामदेव पेचे, बाळासाहेब गोहॊकर,किशोर सातपुते,विनोद कोंगरे, विलास चापले,सुदर्शन विद्दे, महेंद्र मोरे,शैलेश कावळे,जहीर खान ,येवले, देविदास वांढरे,अनिल चौधरी
उत्तम अवघडे, गजेंद्र डेरकर , गजानन बोढे, अशोक दुबे , मालेकर सर , दिनकर आवारी, राजु पिंपळशेडे, वांढरे, जयंत बोढे यांची प्रामुख्याने उपस्थिति होती. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन बाळासाहेब गोहो कर, व आभार देविदास वांढरे यांनी मानले व कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रवंदनेने करण्यास आला.