चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथे पतीने केली पत्नीची हत्या.
एस.के.24 तास
घुग्गुस : चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तीत दिवसेंदिवस वाढ होत असून घुग्गुस शहरात घरगुती वादातून पत्नीची ओढणीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घुग्घुस येथे सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
नाझिमा कलीम शेख वय,33 वर्ष रा.घुग्घुस असे मृत पत्नीचे नाव आहे.हत्या केल्यानंतर पती शेख कलीम शेख इब्राहिम वय,42 वर्ष रा.म्हातारदेवी रोड चिंतामणी कॉलेज जवळ,घुग्घुस याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
कलीम इब्राहिम शेख हा म्हातारदेवी मार्गावरील मुकीन खान यांच्या बिल्डिंगमध्ये भाड्याने राहत होता. पती - पत्नी मध्ये दररोजच घरगुती कारणातून वाद होत होते. सोमवारी सुद्धा असाच वाद झाला.
रागाच्या भरात कलीमने ओढणीने पत्नीचा गळा आवळला. त्याच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने घुग्घुस पोलिस स्टेशन गाठून घटनेची माहिती देत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के करत आहेत.