दलीत आदिवासी च्या कब्जात असलेल्या जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी एकत्र या. - भैयाजी खैरकर

दलीत आदिवासी च्या कब्जात असलेल्या जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी एकत्र या. - भैयाजी खैरकर

 

 मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


नागपूर - दलीत आदिवासी भूमिहीन बेघर ओबीसी गरीब मराठा तथा सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या न्याय हक्कासाठी संविधानात्मक मार्गाने संघर्ष करणारी आशिया खंडातील पहिली क्रांतिकारी संघटना म्हणजे बिगर सातबारा शेतकरी संघटना आणि त्या संघटनेच्या वतीने दिनांक 14 ऑक्टोंबर रोजी जमीन हक्क परिषद संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात लॉर्ड बुद्धा टीव्ही चे संचालक भैयाजी खैरकर यांच्या अध्यक्षतखाली संपन्न झाली.

असून सदर परिषदेला उद्घाटक म्हणून टिळक पत्रकार सभागृहाचे व्यवस्थापक प्रभाकर दुपारे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून फॉरवर्ड ब्लॉक चे प्रदिप देशपांडे मनोज कुमार मुंबई बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते उरकुडा गेडाम, बाबुराव शेडमाके आदिवासी गोंड समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माणिकराव शेडमाके शामादादा कोलाम ब्रिगेड चे अध्यक्ष सुरेश कुमरे फासे पारधी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास पवार उपस्थित होते.


 सदर परिषदेला मार्गदर्शन करताना भैयाजी खैरकर म्हणाले की दलीत आदिवासी समाजाच्या कब्जात असलेल्या महसूल व वन जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी एकत्र येऊन बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे नेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या पाठीशी खंबीपणे उभे राहणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले तसेच जो पर्यंत जमिनीवर आपला कब्जा आहे तो पर्यंत सदर जमिनीच्या नोंदी करणे व ताबा सिद्ध करणे ही सर्वांची जबाबदारी असून संघटनेशी संलग्न राहावे असे आवाहन परिषदेचे उद्घाटक प्रभाकर दुपारे यांनी केले तर भाई जगदीश कुमार इंगळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आंदोलनात्मक भूमिका घेऊन गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात आले.


 असून यापूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाने सर्वांसाठी घरे धोरण अवलंबिले त्याच धर्तीवर विद्यमान सरकारने सर्वांसाठी शेती चे धोरण अवलंबिले असते तर ज्या प्रमाणे निवासी अतिक्रमणे नियमित होत आहेत त्याच प्रमाणे शेतीची अतिक्रमणे नियमित झाली असती परंतु सरकारने त्या कडे अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याचा आरोप भाई जगदीश कुमार इंगळे यांनी केला असून फॉरवर्ड ब्लॉक चे प्रदिप देशपांडे यांनी जाहीर पणे संघटनेच्या कार्याला पाठिंबा दर्शविला तसेच बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते उरकुडा गेडाम यांनी मार्गदर्शन केले.


 शामादादा कोलाम ब्रिगेड चे अध्यक्ष सुरेश कुमरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की अनुसूचित जमाती पैकी कोलाम समाज हा सामाजिक, आर्थिक, राजकीय दृष्टिकोनातून वंचित असल्यामुळे बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे नेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या मार्गदरशनाखाली संघटनेच्या प्रवाहात येत असल्यामुळे कोलाम समाज संघटित  होऊन न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरत आहे तसेच बिगर सातबारा शेतकरी संघटना ही कोन्या एका जातीधर्मासाठी कार्य करीत नसून केवळ बिगर सातबारा शेतकरी महिला पुरुष यांच्या कब्जात असलेल्या जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी एकत्र येऊन काम करीत आहे 


त्यामुळे सर्व लोकांनी जातीचा चष्मा काढून मी बिगर सातबारा शेतकरी आहे आणि त्यासाठी मला लढायचे आहे अशी विचारधारा घेऊन व भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन एकत्र येऊन संघर्ष करणे हि काळाची गरज असल्याचे मत ओबीसी नेते देवराव वाटगुरे यांनी व्यक्त केले या परिषदेमध्ये गडचिरोली जिल्ह्यातून पंकज खोब्रागडे यांच्या नेतृत्वात, 


भंडारा जिल्ह्यातून काशिराम ठाकरे राजेश बावणे वैशाली सुरपाम यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्ह्यातून किरण गेडाम यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्ह्यातून पांडुरंग टेकाम पुरुषोत्तम कोडापे असे शेकडो महिला पुरुष सहभागी झाले असल्यामुळे बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय कार्य अध्यक्ष तथा मा जिजाऊ संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष डा सुखदेव कांबळे आभार व्यक्त केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !