भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या कार्यक्रमाबाबतची आढावा बैठक संपन्न.
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
सावली : शेडयुल्ड कॉस्ट फेडरेशन व समविचारी रिपाई पक्षाची भीमा कोरेगांव शौर्यदिनाच्या कार्यक्रमाबाबतची बैठक गडचिरोली येथील निसर्गरम्य ठिकाणी शेडयुल्ड कॉस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष,अँड,विनय बांबोळे यांच्या अध्यक्षते खाली तर रिपाईचे नेते गोपाल रायपूरे,प्रा. मुनिश्वर बोरकर,पंडित मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
भीमा कोरेगांव शौर्यदिनाचा कार्यक्रम वैनगंगा नदि किणाऱ्यावर मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा व गडचिरोली जिल्हयातील बौद्ध समाज बांधवांची एक समिती गढीत करण्यात यावी.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व रात्रौ दुय्यम कव्वालीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार असे ॲड.विनय बांबोळे यांनी सांगीतले तर प्रा. बोरकर म्हणाले की पुढील होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बौद्ध बांधव एकत्रित आणण्याचा प्रयत्न सुद्धा दोन्ही जिल्हयातील बौद्ध बांधवांच्या समाजीक बैठक घेण्याचे सुचविले.
बौद्ध बांधवावर सामाजिक,राजकीय अत्याचार नेहमीच होतात याला आडा घालण्याकरीता एकसंघ समाज निर्माण करण्याची गरज आहे असे गोपाल रायपूरे म्हणाले.
सदर बैठकीला दिलीप गोवर्धन,अरुणभाऊ शेंन्डे,शरद लोणारे,हेमंत मेश्राम,मिलिंद भानारकर,गजानन उंदिरवाडे , लोमेश सोरते , किशोर उंदिरवाडे,पुरुषोत्तम जांमुळकर ,सुरेश सहारे,गोविंदा सोरते , सुरेश बांबोळे , संजय मेश्राम ' देविदास भैसारे , विनायक दुधे , प्रमोद सोरते , आदि सहीत बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.