नो कांग्रेस,नो भाजपा फक्त रिपब्लिकन पक्ष ; व्याहाड (खुर्द) मेळाव्यात रिपाईची गर्जना. ★ रिपाई ब्रम्हपुरी विधानसभा लढविणार. - रिपाईचे जेष्ठ नेते,रामसिंग सोहेल.

नो कांग्रेस,नो भाजपा फक्त रिपब्लिकन पक्ष ; व्याहाड (खुर्द) मेळाव्यात रिपाईची गर्जना.


रिपाई ब्रम्हपुरी विधानसभा लढविणार. - रिपाईचे जेष्ठ नेते,रामसिंग सोहेल. 


मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


सावली : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन ऐक्य होत असुन संविधान बचाव,आरक्षण बचाव म्हणणाऱ्या कांग्रेसने दलित जनतेला भुलथाप दिले त्यामुळे आता नो कांग्रेस नो भाजपा फक्त रिपब्लिकन पक्ष संपूर्ण महाराष्ट्र असे लोन पसरत आहे.

त्यामुळे रिपब्लिकन पार्टी समविचारी पक्षाना सोबत घेऊन ब्रम्हपुरी विधानसभेच्या निवडणुकीत आपला उमेदवार उभा करण्याचा संकल्प केला आहे तेव्हा रिपब्लिकन जनतेनी सज्ज रहावे अश्या प्रकारचे मार्गदर्शन रिपब्लिकन पार्टीचे जेष्ठ नेते रामसिंग सोहेल यांनी व्याहाड (खुर्द) येथील रिपाईच्या मेळाव्यात केले. 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सावली तालुक्यातील व्याहाड येथे रिपाई कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा संपन्न झाला. सदर मेळाव्याचे अध्यक्ष,रिपब्लिकन पार्टी जिल्हा चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष गोपाल रायपुरे हे लाभले होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन रिपाईचे रामसिंग सोहेल,रिपाई चंद्रपूर जिल्हयाचे प्रदेश सरचिटणीस शिद्धार्थ सुमन रिपब्लिकन पार्टीचे गडचिरोली जिल्ह्याचे जेष्ठ नेते प्रा. मुनिश्वर बोरकर,शेडयुल्ड कॉस्टस फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड,विनय बांबोळे


रिपाईचे जिल्हा संघटक कोमल रामटेके,ॲड.प्रियंका चव्हाण,संतोष रामटेके,महिला प्रमुख लिनता जुनधरे,अनिल वानखेडे,अरुण देवघडे आदि लाभले होते. 


या प्रसंगी रिपाई नेते प्रा.मुनिश्वर बोरकर म्हणाले की चिमुर लोकसभा क्षेत्रात रिपाईची मोठी ताकद आहे.रिपाईने खासदार प्रतिभा धानोरकर,डॉ. किरसान यांना निवडुन आणण्यात शिहांचा वाटा आहे.परंतु कांग्रेसचे उमेदवार खासदार म्हणून निवडून आल्यावर मात्र रिपाई कार्यकर्त्यांना वाईट वागणुक देतात आमचा अनुभव आहे. 


तेव्हा संविधानाचे रक्षण भाजपा किंवा कांग्रेस करू शकत नाही रिपाईच्या विविध गटात विखुरलेले आमचे नेतच संविधानाचे रक्षण करू शकतात म्हणुन आमचे उमेदवार पडले तरी चालेल परंतु विधानसभा निवडणुकीत कांग्रेस किंवा भाजपाच्या उमेदवारांना बौद्धांनी सहकार्य करू नये. या प्रसंगी ॲड.विनय बांबोळे यांनी सुद्धा कांग्रेस पक्षाचा भरपुर समाचार घेतला तर शिद्धार्थ सुमन म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या खुल्या पत्रावर आधारीत रिपब्लिकन पक्ष हा डॉ.राजेंद्र गवई यांचेकडे आहे. 


तो कुणाच्या बापाचा नाही.या प्रसंगी कोमल रामटेके , ॲड.चव्हाण यांचेही मार्गदर्शन लाभले अध्यक्ष स्थानावरून गोपाल रायपुरे म्हणाले की बौद्ध बांधवांच्या अनेक समस्या आहेत त्या समस्या रिपाईचे नेते आम्हीच सोडवू शकतो कोणी कांग्रेसवाले दलितांच्या हाकेला धावून येत नाही हा आमचा आजपर्यंतचा अनुभव आहे. 


बुद्ध मुर्त्या वाटून आमच्या मतावर मजा मारणाऱ्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत धडा शिकविण्याची गरज आहे.ब्रम्हपुरी क्षेत्रात रिपाईचे कार्य आहे आणि रिपाईला मानणारे कार्यकर्त गावागावात आहेत तेव्हा तमाम कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आवाहनही गोपाल रायपुरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन मारोती रायपूरे प्रास्ताविक संतोष रामटेके तर आभार सावली तालुका रिपाईचे अध्यक्ष किशोर उंदिरवाडे यांनी मानले. 


मेळाव्यात राजु बांबोळे,दुधेसर,छायाताई लभाणे,सोरते ' सुरेश बांबोळे,विजय शेंन्डे,नगराळे ताई,विद्या रायपूरे  सहीत व्याहाड (खुर्द) सर्कल मधील रिपाईचे बहुसंख्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !