ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस चा स्तुत्य उपक्रम ; शासकीय रुग्णालयात नवजात बालकांना मच्छरदाणीचे मोफत वाटप.
एस.के.24 तास
चंद्रपूर : नवजात बालकांना मच्छर व इतर किटकांचा त्रास होऊ नये म्हणून व त्यांच्या डेंगू, मलेरिया इत्यादी आजारापासून संरक्षण व्हावे या दृष्टीने दिनांक 31 ऑगस्ट २०२४ ते १ ऑक्टोबर पर्यंत मोफत मच्छरदाणी चे सलग तीन दिवस वाटप करण्यात आले.
सलग तीस दिवस चाललेल्या या कार्यक्रमाचा समारोप दि.०१ आक्टो.ला सरकारी रुग्णालय येथे संपन्न झाल.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुधाकर अडबाले उपस्थित होते त्यांनी मार्गदर्शन करताना ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस तर्फे आयोजित या कार्यक्रमाची प्रशंसा केली.व नवजात बालकांचे मातांना शुभेच्छा देऊन व स्वस्थ भारत निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
उपस्थित डॉक्टर्स,नर्स यांच्याशी देखील यावेळी त्यांनी संवाद साधून दवाखान्यातील माहिती प्राप्त करून त्यांच्या अतुलनीय कार्याची प्रशंसा केली.कार्यक्रमाचे अध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष श्री रामकृष्ण कोंढरा यांनी सहकार्य करणाऱ्या विविध सन्माननीय सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करून यापुढे देखील समाजोपयोगी कार्य करत राहण्याचा निर्धार व्यक्त केला, या कार्यक्रमाला सहकार्य केल्याबद्दल डॉ.श्रीरामे,पीएनसी वॉर्ड इन्चार्ज संजीदा पठाण, शुभांगी गेडाम,प्रियंका देवकर, साधना सरमिक तसेच एल एम सी एस वाय इन्चार्ज प्राजक्ता जानोरकर ,रोशनी राठोड , पल्लवी पुट्टेवार, विशाखा पिल्लेवार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी गोपाल अमृतकर डॉ.अनिल शिंदे ,सुधाकर अंभोरे,सायली देठे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद शरीफ गुरुजी यांनी तर आभार जिल्हा सचिव निसार शेख यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे यशस्वीते करिता माजी - संस्थापक अध्यक्ष मनीष तिवारी,जयंत देठे,नाहीद हुसैन, सुभाष जुनघरे,सुरज देवगडे,योगनद चंदनवार , नाहीद काजी मॅडम,मनोज मटकुलवार, डॉ. तेजस तुले, सूरज देवगडे, सायली देठे, कामरान अन्सारी , सुभाष जुनघरे, संजीवनी वासेकर, शासत्रकार , दिलीप चंदेल, उत्तम पाल , रवि पुरेड्डीवार, अरुण भाऊ आदींनी प्रयत्न केले.