राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना वाहिली मौन श्रद्धांजली.
★ तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून रणमोचन येथे विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेचा समारोप.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१६/१०/२४ तालुक्यातील रणमोचन (नविन आबादी) येथे ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दि. ११ ऑक्टोबरला ठीक ४.५८ वाजता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धाजली वाहण्यात आली.यावेळी भगव्या टोप्यांनी परिसर फुलून गेला होता.गुरुदेव भक्तांनी राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली वाहिली.त्यानंतर भव्य विदर्भ स्तरीय खंजेरी स्पर्धेचे उद्घाटन सोहळा घेण्यात आले.यावेळी खासदार डॉ.नामदेवराव किरसान
प्रभाकर सेलोकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती ब्रम्हपुरी,माजी जी प सदस्य प्रमोद चिमूरकर, माजी जी.प. उपाध्यक्ष किष्णभाऊ सहारे,प्रमोदजी तोंडरे सर पारडगाव,अण्णाभाऊ ठाकरे, सिध्देश्वर भर्रे,अध्यक्ष म्हणून विष्णूजी तोंडरे (मुख्याध्यापक) दलित मित्र प्रा.डी.के.मेश्राम,डाँ. गोकुलदास बालपांडे, ननावरे बाबूसाहेब, तालुका पत्रकार संघाचे सचिव गोवर्धन दोनाडकर
माजी सरपंच भारत मेश्राम, शैलाताई राऊत, सरपंच सौ निलिमा राऊत, उपसरपंच सदाशिव ठाकरे,ग्रामपंचायत सदस्य घनश्याम मेश्राम, सौ. अस्विनी दोनाडकर, संजय प्रधान,ह.भ.प. सहारे महाराज , बाळकृष्ण ठाकरे, योगेश ढोरे, शुभम नाकतोडे, बिसन प्रधान, अशोक भूते, उत्तम बगमारे, लांजेवार सर, रेशन शेभरकर, मयुरी मेश्राम, माजी सरपंच मंगेश दोनाडकर, विलास मेश्राम, चौरू दोनाडकर,पत्रकार विनोद दोनाडकर, राजेंद्र चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरानी ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.रात्रौ ठीक ९ -०० वाजता भव्य विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
विशेष म्हणजे गावातील हरिओम ठाकरे(एमबीबीएस), नयन मेश्राम (एमबीबीएस)व शुभम नाकतोडे(शिक्षक) यांची शासकीय सेवेत निवड झाल्याबाबद्दल आई-वडिलांसह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उद्घाटन प्रसंगी रणमोचन येथील महिलानी भजन सादर केले व नंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.सूत्रसंचालन पराग राऊत व गोवर्धन दोनाडकर तर आभार मंगेश दोनाडकर यांनी व्यक्त केले.
या भव्य विदर्भ स्तरीय खुल्या भजन स्पर्धेत पुरुष व महीला भजन मंडळानी सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढविली तसेच सर्व विजयी पुरुष,महीला भजन मंडळाचे श्री गुरुदेव सेवा मंडळ रनमोचन(नवीन आबादी) यांनी पारितोषिक (बक्षिस) वितरण करून अभिनंदन केले.
कार्य प्रशिक्षक म्हणून राजू ठाकूर, नरेंद्र खोब्रागडे सर ,गिरीधर दोनाडकर ब्रह्मपुरी ,सुनिल नाकतोडे,यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. गुरुदेव सेवा मंडळ व ब्रम्हलीन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महोत्सव कमिटी तसेच महिला मंडळ रणमोचन (नवीन आबादी) सर्व गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.