मातीतून घडणाऱ्या कलावंताला समाजाचा पाठींबा आवश्यक. - प्राचार्य सदानंद बोरकर
अमरदीप लोखंडे, सहसंपादक
ब्रम्हपुरी - मातीतून घडणाऱ्या कलावंताला समाजाचा पाठींबा आवश्यक असतो.कलावंताचे भावविश्व घडविण्यात समाजाचे फार मोठे योगदान असते.कलावंताला सतत यश व अपयशाचा सामना करावा लागतो.
माझ्या सर्व कलाकृती, नाटके व साहित्य समाजाच्या वास्तवाचे चित्रण करणाऱ्या आहेत. कलावंत संवेदनशील असतो. समाजिक अस्वस्थता हीच माझ्या कलेचे गमक आहे, असे ह्रदयस्पर्शी विचार प्राचार्य सदानंद बोरकर यांनी व्यक्त केले.
ते कोहळी समाज बहुउद्देशीय विकास मंडळ, ब्रम्हपुरी च्या वतीने आयोजित कोजागिरी व स्नेहमिलन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.धनंजय गहाणे यांनी आपल्या मनोगतात ब्र्म्हपुरीत कोहळी समाजाची वाटचाल अधोरेखित केली.
यावेळी व्यासपीठावर सौ.योगिता बोरकर, बाबुराव गहाणे,डॉ.रामकृष्ण झोडे,काशिनाथ कापगते, माणिक पर्वते,शहाजी संग्रामे, जगननाथ लांजे, डॉ.यादव लांजे उपस्थित होते.
या प्रसंगी प्राचार्य सदानंद बोरकर व त्यांच्या पत्नी सौ. योगिता बोरकर यांचा संपत्नीक सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मार्तंड गहाणे गोपाल थेरकर, डॉ. मोहन कापगते, गोपीनाथ मस्के, भोजपाल गहाणे , अशोक मस्के,रतिराम निकुरे, भागवत लंजे, नंदू मस्के, खेमराज डोंगरवर व अतिश बोरकर इत्यादींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला कोहळी समाजातील ब्यान्नव परिवार उपस्थित होते.