जीवनात मोठ होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. - वसंत भाऊ वारजूरकर
अमरदीप लोखंडे - सहसंपादक .
ब्रम्हपूरी : दिनांक,११/१०/२०२४ आजचे जीवन धकाधकीचे आहे. गावातील युवकांना जीवनात मोठ व्हायचे असेल तर महापुरुषांच्या विचारांसोबत शिक्षणा शिवाय पर्याय नाही.ज्याच्या घरी नाही पुस्तकाचे कपाट त्याचा घर
एक दिवस भुईसपाट झाल्याशिवाय राहणार नाही : -
जीवनात मोठ व्हायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन अ-हेरनवरगाव येथे शारदा माता उत्सवानिमित्त बालमित्र सार्वजनिक शारदा माता मंडळा च्या वतीने आयोजित जाहीर कथासार पंचरंगी उद्घाटन कार्यक्रमा प्रसंगी चिमूर व ब्रम्हपुरी विधानसभा श्रेत्राचे लोकप्रिय भाजपा जेष्ठ कार्यकर्ते वसंतभाऊ वारजुरकर यानी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन गोवर्धन दोनाडकर पत्रकार ब्रम्हपुरी, सहउद्घाटक म्हणुन प्रा. मंगेश देवढगले तर प्रमुख अतिथि म्हणून विलासभाऊ उरकुडे माजी उपसभापती ब्रह्मपुरी, श्रीकांतजी पिलारे ग्रा.पं. सदस्य अ-हेरनवरगाव, उपसरपंच जितू कऱ्हाडे,प्रशांत राऊत पत्रकार अ-हेरनवरगांव
चंद्रकांतजी गाताडे ग्रा.पं. सदस्य, देविदास बुल्ले भाजपा कार्यकर्ते,क्रिष्णाभाऊ दिघोरे पोलीस पाटील भालेश्वर,मंगेश जराते , विवेक देवतळे, अभिजित भागडकर, प्रज्वल जनबंधू , नवनाथ राऊत, विशाल कामडी, मंगेश करानकर, अभय ढोरे, सोनू भूते, विकास चौधरी, राजेश्वर इंदुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार भास्कर सावकार यानी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन चोपकार, राहुल देशाई, शुभम उरकुडे,जितू बुल्ले,प्रशांत राऊत, युवक व युवती तसेच बाल मित्र सार्वजनिक शारदा माता मंडळाचे कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्य केले..