अहेरी विधानसभा क्षेत्र - दे धक्का. ग्रामसभेच्या माध्यमातून नितिन पदा यांची अपक्ष उमेदवारी जाहीर.

अहेरी विधानसभा क्षेत्र - दे धक्का. ग्रामसभेच्या माध्यमातून नितिन पदा यांची अपक्ष उमेदवारी जाहीर. 


गडचिरोली - मुनिश्वर बोरकर  


गडचिरोली : भाजपा व कांग्रेस हे दोन्ही पक्ष एकाच माळेचे मणी आहेत. आमच्या मतावर निवडून येऊन आदिवासींच्या एकही समस्या सोडवू शकत नाही. म्हणुन आता नो भाजपा नो कांग्रेस ओन्ली ग्रामसभा म्हणत मुलचेरा' अहेरी एटापल्ली ' भामरागड व सिरोंचा या पाचही तालुक्यातील ग्रामसभेच्या ठरावातुन ग्रामसभेचा एटापल्ली तालुक्यातील तरुण तडफदार उमेदवार अपक्ष म्हणुन नितिन पदा यांची उमेदवारी पत्रकार परिषेदत जाहीर करण्यात आली. 

कांग्रेस किंवा बिजेपी स्वतःच्या कार्यकर्त्यांना मोठे करण्याचे एकमेव काम सुरू असुन लोकसभा निवडणुकीत आदिवासींच्या एकरा समस्या सोडवा या अटीवर जिल्हयातील सर्व ग्रामसभाच्या लोकांनी कांग्रेसला सहकार्य केले व कांग्रेसचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांना निवडून आणले परंतु खासदार महाशयांनी संसदेत आदिवासींच्या एकही समस्या मांडल्या नाही व मांडणारही नाही केवळ आदिवासींना भूलभापा देण्याचे काम सुरु आहे.


 म्हणुन अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्यातील ग्रामसभेच्या सदस्यांनी तोडसा येथे दि . ०१ऑक्टोंबर २०२४ ला दोन हजार आदिवासी बांधवाच्या बैठकीत  ठराव घेऊन अपक्ष उमेदवार नितिन पदा यांना अहेरी विधान सभेच्या मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला . आलापल्ली येथील कांग्रेसच्या मेळाव्यात अहेरी क्षेत्रातील ग्रामसभा आमच्या सोबत आहे असे कांग्रेसच्या नेत्यांनी सांगीतले ते चुकीचे आहे. 


आम्ही पडलो तरी चालेल परंतु कांग्रेस 'राष्ट्रवादी कांग्रेस किंवा भाजपाच्या दावणिला जाणार नाही असे ठामपणे नितिन पदा ' शिवाजी नरोटे , कुणाल कोसे यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले . मी उभा राहत असतांना ग्रामसभेच्या नियम व अटिनुसार चालेल आदिवासींना मी धोका देणार नाही. आमच्या ११ अटीपैकी कांग्रेसने एकही अट ' समस्या सोडविली नाही म्हणून ग्रामसभेचा कांग्रेस सोबत कोणत्याच प्रकारचा संबंध राहणार नाही. 


आमचा आदिवासी बांधव प्रत्येक कुटुंबातील शंभर रुपये व पायलीभर तांदुळ वर्गणी म्हणून ग्रामसभेच्या अपक्ष उमेदवारांना देणार आहेत.सुरजागड प्रकल्पाची खनीजनिधी आमच्या एरियात घ्या तरच आदिवासींचा विकास होइल याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत. वेळप्रसंगी ग्रामसभा आंदोलनही करेल . ग्रामसभेचा अपक्ष उमेदवार उभा करतांना गोंगपा ' रिपाई ' बहुजन भारतमुक्ती मोर्चा व इतरही समविचारी पक्ष आमच्या सोबत राहणार आहेत. 


एकंदरीत ग्रामसभेच्या अपक्ष उमेदवारांची ताकद पाहता कांग्रेस , राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे दोन्ही गटाला चांगलास घाम फुटणार आहेत सोबतच गोंडवाना गणतंत्र पार्टीला मानणारे अनेक आदिवासी अहेरी विधानसभा क्षेत्रात आजही आहेत त्यांचासुद्धा फायदा ग्रामसभेच्या उमेदवारांना होइल. कारण यापूर्वी मंत्री धर्मराव बाबा आत्राम गोंडवाना गणतंत्र पार्टीचा चिन्हावर निवडून आले होते हे विशेष : पत्रकार परिषदेला नितिन पदा ' शिवाजी नरोटे , कुणाल कोवे , देविदास मडावी , कोतुराम पोटावी , गोंडवाना गणतंत्र पार्टीचे नेते प्रशांत मडावी


रिपाईचे नेते प्रा. मुनिश्वर बोरकर ' बहुजन भारत मुक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष भोजराज कानेकर ज्ञानेश्वर मुजुमकर , प्रमोद राऊत ' प्रेमदास रामटेके डोमाजी गेडाम तर महादेव पदा , शिवा मड्डामी , मधुकर पोटावी , मनोज कोरामी , विलास नरोटे , सनकु पोटावी , महेश गावडे , विलास कोंदामी , विकास पुंगाटी , बाबुराव तलांडी सहीत अहेरी विधानसभा क्षेत्रातील ग्रामसभेचे गावोगावचे सदस्य बहुसंखेनी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !