बसपाचा मेळावा संपन्न संविधान वाचविण्यासाठी बसपा सज्ज ; आपण विधानसभेची जोरदार तयारी ठेवा. - सुनिल डोंगरे

बसपाचा मेळावा संपन्न संविधान वाचविण्यासाठी बसपा सज्ज ; आपण विधानसभेची जोरदार तयारी ठेवा. - सुनिल डोंगरे 


गडचिरोली मुनिश्वर बोरकर 


गडचिरोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेत बदल करणे, सविधान नष्ट करणे हे सोप काम नाही.असे कृत्य करणाऱ्यांना आम्ही चांगलाच धडा शिकवू यासाठी बसपाच्या नेत्या मायावतीच्या आदेशांनी संविधान बचाव जनजागृती अभियान देशभर पार्टी तर्फे सुरु आहे. 

आणि आम्ही सज्ज आहोत.परंतु तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज राहून येणाऱ्या विधानसभेत बसपा ची सत्ता बसवा , बसपा आजही जगात तिसऱ्या नंबरचा पक्ष आहे. अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन बसपाचे प्रदेश्याध्यक्ष ॲड. सुनिल डोंगरे यांनी नुकत्याच पार पडलेल्या बसपाच्या मेळाव्यात केले. 


बहुजन समाज पार्टीचा भव्य मेळावा शिवाजी महाराज नगर,महिला महाविद्यालय जवळ गडचिरोली येथे पार पडला यात कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी बसपाचे महाराष्ट्र प्रदेश्याध्यक्ष ॲड सुनिल डोंगरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शिंदे,कोषाध्यक्ष खूफभाई,महाराष्ट्र प्रदेश महासचिव मुकुंद सोनावणे,नागपूर बसपा जिल्हाध्यक्ष लांजेवार , महाराष्ट्र सचिव काळूराम चौधरी,सुनिल कोचे आदि लाभले होते तर बसपाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष शंकर बोरकुट बसपाचे प्रभारी भाष्कर मेश्राम तर मंचावर माजी जिल्हाध्यक्ष रमेश मडावी ,वामन राऊत '


 मंदिप गोरडवार ,नरेश महाडोळे , ताजमुल हुसेन , सुधिर वालदे , कविता वैद् ' प्रिती मडावी , दुषांत चांदेकर आदि होते. राज्यस्तरीय संविधान जनजागरण रॉली आरमोरी वरून गडचिरोली शहरात ढोल ताश्यांच्या गजरात व गोंडी नृत्य सहीत शहरात पोहचताच स्वागत करून गांधी चौक ते कार्यक्रम स्थळी पोहचली . बसपा नेत्याच्या मार्गदर्शनानंतर बसपा कार्यालयाचे उदघाटन पार पडले . बसपाच्या कार्यक्रमात संविधान बचाव व विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित होते. 


बसपाच्या मेळाव्यात जिल्हयातून हजारो कार्यकर्त्यांनी स्वयंस्फृतीने (कांग्रेस - बिजेपी सारखे गाड्या व पैसे देऊन नाही) हजेरी लावली होती.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !